Anjali Damania Threat saam tv
Video

तुमचा गेम करायचाय...; अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, VIDEO

Anjali Damania threatened : अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती त्यांनी नुकतीच दिली. याबाबत मुख्यमंत्र्यांना कळवले आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच सुरक्षाही नाकारली आहे.

Nandkumar Joshi

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट आखल्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. अंजली दमानिया या अमेरिकेत होत्या. त्यावेळी त्यांच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाली होती. ज्या दिवशी जरांगे पाटील यांना धमकी आली होती, मला वाटतंय त्याच दिवशी त्यांचा फोन आला होता. माझा गेम करायचा आहे, अशी गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. धमकी देणारे लोक आहेत ते सेकंड रँकचे आहेत, काळजी घ्यावी. तुम्ही गाड्या बदलून बदलून वापरा. तसेच वाहनामध्ये असताना तुम्ही फोन बंद करा, असे त्यांनी सांगितले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा फोन आला होता. माझा गेम करायचा आहे, असे इनपूट्स त्यांना मिळाले होते. यांचं अति होत चाललं आहे. यांना धडा शिकवायचा आहे. यांचा गेम करायचा आहे, अशी त्यांची भाषा होती. ही माहिती मला अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असून, सावध राहण्यास सांगितले. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. त्यांनी मला सुरक्षा व्यवस्था घेण्यास सांगितले. पण मला सुरक्षा व्यवस्था नको. मी सुरक्षा घेणार नाही, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT