AMIT SHAH ‘CHECKMATES’ FADNAVIS? SANJAY RAUT’S BIG CLAIM SHAKES MAHAYUTI Saam Tv
Video

महायुतीत अंतर्गत युद्ध! अमित शाह–शिंदे जवळीक, फडणवीस अडचणीत? संजय राऊतांचा खळबळजनक दावा|VIDEO

Amit Shah Checkmate Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षावर खळबळजनक दावा केला आहे.

Omkar Sonawane

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीमधील अंतर्गत वादावर बोट ठेवत खळबळजनक दावा केला आहे. अमित शहा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चेकमेट करायचं आहे, म्हणूनच ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताकद देत आहेत असा आरोप राऊत यांनी केला. फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा महायुतीला विरोध असल्याचंही त्यांनी म्हटलं.

शिंदेंना दिल्लीत ताकद दिली जातेय जेणेकरून फडणवीसांना दिल्लीत येण्यापासून रोखता येईल असं राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, महायुती म्हणजे कोणती महायुती आहे. हे आता मला कळलं. मिंदेंचा पक्ष हा अमित शाहंचा पक्ष आहे. महाराष्ट्रमध्ये देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण हें महायुतीच्या विरोधात आहे. एकनाथ शिंदे अमित शाहंकडे आपलं रडगाणं सांगायला गेले होते. अमित शाहंना देवेंद्र फडणवीसांना चेकमेट करायचं आहे. त्यांना फडणवीस यांना दिल्लीला येऊन द्यायचं नाहीये. दोन ठाकरे एकत्र आले याची भीती आहे. असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तहसीलदारांच्या रील प्रकरणावर काँग्रेस संतप्त; कारवाईची मागणी

Kitchen Tips : कापलेला नारळ अनेक दिवस ताजा कसा ठेवायचा? या घरगुती टिप्स करा फॉलो

Nauvari Saree Designs: गणेशोत्सवासाठी अस्सल मराठमोळा लूक; नऊवारी साडीच्या या 5 डिझाईन्स सौंदर्य वाढवतील

Radha Patil: पुण्यात मोठी कारवाई; प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा राधा पाटीलवर गुन्हा दाखल

High Blood Sugar: अचानक हे 5 बदल दिसले तर समजा शरीरात डायबेटीजला होतेय सुरुवात!

SCROLL FOR NEXT