Ambedkar followers stage a roadblock near Chunabhatti after police stop autos heading towards Chaityabhoomi on Mahaparinirvan Diwas. Saam Tv
Video

आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको का केला? काय नेमके कारणे? VIDEO

Reasons Behind Ambedkar Supporters Protest: मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पोलिसांनी रिक्षा अडवल्यामुळे आंबेडकर अनुयायांनी रास्ता रोको आंदोलन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीकडे जाणाऱ्या भक्तांनी रस्ता रोखल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.

Omkar Sonawane

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरातून लाखों आंबेडकर अनुयायी हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. बाबासाहेबांना आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनेक भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल होत आहेत. या दरम्यान मुंबईच्या चुनाभट्टी सायन परिसरात आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला. गेल्या दोन तासांपासून या ठिकाणी रास्ता रोको केला. रस्ता रोखून धरल्याने दादरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

नेमके काय घडले?

चुनाभट्टीजवळ रिक्षातून आलेल्या आंबेडकर अनुयायांना चैत्यभूमीच्या दिशेला जायचे आहे. पण पोलिसांनी त्यांची रिक्षा अडवली. पोलिस रिक्षाला पुढे जाऊ देत नाहीत म्हणून आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. यामुळे या ठिकाणी गेल्या दोन तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिस आणि भीम अनुयायांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT