Alcohol Industry Hit by Global Crisis Saam Tv
Video

Alcohol Shortage: दारू पिणाऱ्यांचे टेन्शन वाढलं, युद्धाचा फटका आता दारूलाही बसणार; नेमकं कारण काय?

Alcohol Industry Hit by Global Crisis: इराण- इस्राइलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता दारू पिणाऱ्यांना देखील बसणार आहे. त्यामुळे दारु पिणाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. नेमकं कारण काय ते घ्या जाणून...

Priya More

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता हळूहळू संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. या युद्धामुळे इंधन, गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याचा परिणाम आता भाजी मार्केट, हॉटेल, रेस्टॉरंटसह इतर व्यवसायांना देखील बसू लागला आहे. देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे नागरिक चिंतेत आले आहेत. या युद्धाचा फटका हळूहळू सर्वच गोष्टींना बसू लागला आहे. गॅस आणि पेट्रोलच्या टंचाईनंतर आता दारूचाही तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे कॅन आणि काचेच्या बाटल्यांचा साठा केवळ १५ दिवस पुरेल इतकाच उरला आहे. मध्यपूर्वेतील अस्थिर परिस्थितीमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम आता उद्योगांवर होत आहे. साठा संपल्यास उत्पादन थांबण्याची भीती असून दरमहा सुमारे २०० कोटी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्यांचे टेन्शन वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर दारूचा देखील तुटवडा निर्माण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT