Ajit Pawar 
Video

Ajit Pawar : अजित पवारांचं टेन्शन वाढलं? जागावाटपाच्या बैठकीला अनेक आमदारांची दांडी!

Ajit Pawar News : अजितदादांनी आपल्या निवस्थानी आमदारांची बैठक बोलवली होती. पण या बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Politics : अजित पवार यांच्या निवासस्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. बुधवारी रात्री झालेल्या या बैठकीत आमदारांकडून मतदारसंघातून आढावा घेण्यात आला. बैठकीला सर्व आमदार यांना उपस्थित राहण्याचे आदेश असताना अनेक आमदार गैरहजर राहिले होते. वैयक्तिक कारण देत काही आमदारांनी दांडी मारली. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघात घाटी गणेश विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने अनुपस्थित होते. तर नवाब मलिक हे ही आजच्या बैठकीला अनुपस्थित होते.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बुधवारी बैठक झाली, त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास ७० जागांची मागणी करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय सध्याच्या विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापले जाणार नाही, अशी हमीही प्रमुख नेत्यांकडून देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT