मुंबई : जनतेनं तुमचा करेक्ट कार्यक्रम केलाय असं म्हणतं अजित पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येतोय त्याला प्रतिउत्तर दिलं आहे . मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत.
राज्यात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी केलेल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं. आता कसं वाटतंय, गरम वाटतंय की कसं तुम्हीच बघा, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला डिवचलं.
शपथविधीच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला. यावरून सत्ताधारी नेत्यांनी टीका केली.तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणात याचाच उल्लेख करत विरोधकांनी आता तरी डोळे उघडावेत असा टोला लगावला..तर दुसरीकडे ईव्हीएमविरोधातला मुद्दा आता सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ईव्हीएमविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे ईव्हिएमविरोधातील लढाई आता सुप्रीम कोर्टात लढली जाण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.