Manikrao Kokate Saam Tv
Video

Manikrao Kokate: राजीनाम्याऐवजी माणिकराव कोकाटेंचं खातेबदल होणार? अजित पवारांची नाराजी

Ajit Pawar On Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आज कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राजीनाम्याऐवजी कोकाटेंचं खातेबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Priya More

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रम्मी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी सरकार भिकारी असल्याचे म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राजकारण तापले आहे. अशामध्ये आज माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्यावरून कोकाटे यांना फटकारले आणि नाराजी व्यक्त केली. या भेटीनंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याऐवजी खातेबदल होणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

राजीनाम्याऐवजी कोकाटेंचं खातेबदल होण्याची शक्यता आहे. माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. 'बोलताना भान ठेवा, सतत चुका करता, कितीदा माफ करणार?', असे म्हणत अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना तंबी दिली. तुमच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वारंवार सरकारची बदनामी होत असल्याचे म्हणत अजित पवार यांनी त्यांची चांगली कानउघडणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वारकरी संप्रदायातील घुसखोरीचा वाद पेटला, राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंवर शाईफेक

सुप्रिया सुळे यांच्या कारचा अपघात; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भरधाव वाहनाने दिली धडक

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट, वहिनीनं दीराला ऊसाच्या शेतात बोलावलं; रागाच्या भरात गुप्तांग कापलं, धक्कादायक कारण

Mukhyamantri Mahila Rojgar Yojana : 1.81 कोटी महिलांच्या बँक खात्यात कधी पैसे येणार? सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: विकास लवांडे आणि शरद पवारांची फोनवरून चर्चा

SCROLL FOR NEXT