Mla Sunil Shelke Latest News Saam TV
Video

Maval News : शरद पवारांच्या पक्षाला भाजपचा पाठिंबा? अजितदादांच्या आमदाराचा गंभीर आरोप

Mla Sunil Shelke Latest News : विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवार गटाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Satish Daud

विधानसभा निवडणुकीआधी महायुतीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे. मावळ विधानसभेची जागा अजित पवार गटाकडे असताना भाजपने या जागेवर आपला दावा केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी गंभीर आरोप केले आहेत. मावळमध्ये अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपला चालत नाही. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादी चालते असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.

सध्या मावळ मध्ये भाजपचे काही पदाधिकारी हे अजित पवार हे कसे चुकीचे आहेत. मावळ गोळीबार अजित पवारांनी करायला लावला, अजित पवार कसा अन्याय करत आहेत, विधानसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करायची नाही अशा अफवा लोकांपर्यंत पोहोचवत असल्याचंही आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कशी मदत करता येईल याची रणनिती मावळमधील भाजप करत असल्याचा देखील आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला. मावळमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान आमदार सुनील शेळके यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे महायुतीत वादाच्या ठिणग्या उडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

Amruta Dhongade: अमृताचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही भरेल हुडहुडी

SCROLL FOR NEXT