Adivasi students cramped inside a goods truck en route to school in Nandurbar’s Molgi village — a shocking image of Maharashtra's education divide. Saam Tv
Video

School Boys Risk: गुरं नेतात तसं मुलं नेली जातायत! शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास, पाहा VIDEO

No Roads, No Safety: नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना आजही शाळेसाठी मालवाहू ट्रकमधून जीवघेणा प्रवास करावा लागतोय. सुरक्षितते अभावी आणि सुविधांचा अभाव असलेल्या या परिस्थितीमुळे पालकांमध्ये संताप उसळला आहे.

Omkar Sonawane

राज्याच्या विकासाच्या गप्पा सुरू असतानाच दुसरीकडे आदिवासी भागातील शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची परिस्थिती मात्र धक्कादायक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम मोलगी गावातील आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नायडोंगरी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आजही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.

शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी या आदिवासी विद्यार्थ्यांना मालवाहू ट्रकमधून नेण्यात येत आहे. ट्रकमध्ये तब्बल चाळीस विद्यार्थी कोंबलेले असून, ना कुठली सुरक्षितता, ना कोणती देखरेख कोणतीही सुरक्षाव्यवस्था न करता विद्यार्थ्यांना ट्रकद्वारे शाळेत पोहोचवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गुरं नेण्यासाठी जसं ट्रकमधून नेलं जातं, तसंच आमच्या मुलांचंही आयुष्य प्रशासनाला स्वस्त वाटतंय का? असा सवाल पालक विचारत आहेत.

आदिवासी भागात आजही मूलभूत सुविधा, रस्ते, वाहतूक यांचा अभाव आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही. शिक्षणासाठीचा प्रवास त्यांच्या जीवावर बेतत असेल, तर ही राज्य सरकारसाठी मोठी शरमेची बाब आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Ashok Kharat Case: कोडवर्डवाले २५०० नंबर; अशोक खरातच्या मोबाइलमधील मायाजाल पाहून पोलीसही चक्रावले

मोठी दुर्घटना! कराडमध्ये केमिकल बनवणाऱ्या कंपनीत स्फोट अन् अग्नितांडव, पाहा व्हिडिओ

Kerosene: पेट्रोल- LPG नंतर आणखी एक दिलासादायक बातमी, रॉकेलबाबत सरकारचा मोठा निर्णय

Summer Hair Care : सततच्या केस गळतीने हैराण झालात? १० दिवसांत येईल जाडजुड वेणी, फक्त करा 'हा' आयुर्वेदिक उपाय

SCROLL FOR NEXT