Water Scarcity : पावसाळा लागला तरी पाण्यासाठी पायपीट सुरूच; नंदुरबार, मेळघाट परिसरात अजूनही भीषण पाणीटंचाई

Nandurbar Amravati News : राज्यातील अनेक भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. तसेच संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना भर उन्हाळ्यात पूर आल्याचे चित्र
Water Scarcity
Water ScarcitySaam tv
Published On

सागर निकवाडे/ अमर घटारे  
नंदुरबार/ अमरावती
: उन्हाळा सुरु झाल्यानंतर राज्यात सर्वाधिक पाणीटंचाईचा सामना नंदुरबार आणि अमरावतीच्या मेळघाट परिसरात करावा लागला आहे. दरम्यान अवकाळी पावसानंतर पाणीटंचाईची समस्या दूर झाली आहे. तर आता राज्यात जोरदार पाऊस सुरु असताना नंदुरबार आणि मेळघाट परिसरात असलेली पाणीटंचाई कायम आहे. यामुळे आजही या भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. 

राज्यातील अनेक भागात मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले आहे. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच संपूर्ण मे महिन्यात अवकाळी पावसाने देखील जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना भर उन्हाळ्यात पूर आल्याचे चित्र होते. यामुळे उन्हाळ्यात जाणवत असलेली पाणीटंचाईची समस्या दूर झाली होती. मात्र अमरावती आणि नंदुरबार जिल्ह्यात पाण्यासाठीची पायपीट अजून देखील थांबलेली नाही. 

Water Scarcity
Pandharpur : विठ्ठल दर्शनाची आस राहिली अपूर्ण; चंद्रभागेत स्नान करायला गेलेल्या भाविकाचा मृत्यू

मेळघाट परिसरात महिला डोक्यावर आणताय पाणी 

पावसाळा सुरू झाला असताना देखील अमरावतीच्या मेळघाट परिसरातील मोथा गावात महिलाना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते आहे. गावात पाणी येत नसल्याने गावाबाहेर एक किमी अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी जावे लागत असून महिला डोक्यावर पाणी आणत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी आहे. 

Water Scarcity
Washim : १२ फूट उंच भिंतीवरून उडी मारून मुलीने काढला पळ; निरीक्षण गृहातील मुलगी सहा दिवसांपासून बेपत्ता

सातपुड्यात पाणीटंचाईची झळ कायम

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा परिसरात देखील भर पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाळा असूनही दुर्गम भागात पाणीटंचाईची झळ कायम असल्याने सातपुड्याच्या दुर्गम भाग असलेल्या अक्राणी तालुक्यातील बिलगाव, बर्डीपाडा भागात पाण्यासाठी आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत. हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पर्यंतचा प्रवास अजूनही थांबलेला नसून दोनशे फूट खोल दरीत उतरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com