VIDEO: वरळीतील Hit & Run प्रकरणातील आरोपीची व्हॉईस ग्लोबल बारमध्ये 18 हजारांची दारु पार्टी SAAM TV
Video

VIDEO: वरळीतील Hit & Run प्रकरणातील आरोपीची व्हॉईस ग्लोबल बारमध्ये 18 हजारांची दारु पार्टी

Worli Hit & Run: वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपीने जुहूच्या व्हॉईस ग्लोबल बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केली. आग्रीपाडा पोलीस आणि जुहू पोलिसांचे पथक जुहू येथील व्हाइस बारमध्ये चौकशीसाठी पोहचले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यातील हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता वरळीत देखील अशीच एक घटना घडली आहे. एका भरदाव गाडीने दुचाकीला धडक दिली आणि मागे बसलेल्या महिलेला फरफटत नेले, यात त्या महिलेचा दुर्देवी मृत्यु झाला. याप्रकरणी पोलिसांकडून शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांना अटक करण्यात आली आहे. अपघातावेळी राजेश शहा आणि त्यांचा ड्रायव्हर गाडीमध्ये उपस्थित असल्याचं समोर आलं आहे. अपघातातील गाडी मिहिर शहाच्या नावाने असून मिहिर गाडीचा सेकंड Owner आहे. अपघातानंतर मिहिर वांद्रे कलानगर येथे गाडी सोडून पळून गेला, महिरने वडिलांना सकाळी अपघातानंतर फोन करून घटनेची माहिती दिली. त्याच्यानंतर फोन बंद केला. आणि सध्या महिर फरार आहे तसेच मिहिरची आई आणि बहिणी देखील घराला टाळे ठोकून फरार आहेत. पोलीसांची चार पथकं मिहिरचा शोध घेत आहेत.

या प्रकरणाची चौकशी सुरु असून आग्रीपाडा पोलीस आणि जुहू पोलिसांचे पथक जुहू येथील व्हाइस बारमध्ये पोहोचले. या प्रकरणातील आरोपी मिहिर शाह याने काल रात्री ११ वाजता जुहूच्या व्हॉईस ग्लोबल बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती. पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघाला. त्यानंतरच अपघाताची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा आणि जुहू पोलिसांचे पथक वाइस ग्लोबल बारमध्ये पोहोचले. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. व्हाइस बारचे मालक करण शाह यांनी सांगितले की, मिहिर शाह शनिवारी रात्री 11.08 वाजता चार मित्रांसह बीएमडब्ल्यू कारमधून बारमध्ये आले होते. बारमध्ये त्यांनी तब्बल १८ हजाराचं बील केलं. त्यांच्यासोबत कोणतीही मुलगी नव्हती. सर्वांनी एक, एक बिअर घेतली. त्यावेळी चौघेही नॉर्मल होते. बिल भरल्यानंतर 1.26 वाजता निघाले. दरम्यान या ठिकाणी असणारा सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलिसांनी जप्त केला आहे. प्रकरणाची पोलीसांकडून चौकशी सुरु असून पोलीस मिहिरचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT