Abhijeet Patil, Ramesh Kadam News saam tv
Video

VIDEO : फडणवीसांचे निकटवर्तीय अभिजीत पाटील तुतारी हाती घेणार?

Sharad Pawar Group : शरद पवार गटकडून आज पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. यात अभिजीत पाटील आणि रमेश कदम यांनी देखील पवारांची भेट घेतली आहे.

Saam Tv

अभिजीत पाटील आणि रमेश कदम हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. पुण्यातील निसर्ग कार्यालयात शरद पवार आज चौथ्या दिवशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यावेळी अभिजीत पाटील आणि रमेश कदम यांनी पवार यांची भेट घेतली आहे. अभिजत पाटील हे विधानसभेसाठी सोलापूरच्या माढ्यामधून इच्छुक आहेत. तर रमेश कदम हे सोलापूरच्या मोहोळ मतदारसंघातून इच्छुक आहेत. त्याच अनुषंगाने हे दोन्ही इच्छुक उमेदवार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले आहे.

पुण्याच्या निसर्ग मंगळ कार्यालयात आज सलग चौथ्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांच्या आज मुलाखती होत आहे. यावेळी सोलापूरमधील मोहोळ आणि माढा या मतदारसंघासाठी इच्छुक असलेले अभिजीत पाटील आणि रमेश कदम हे उमेदवार शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. रमेश कदम हे मोहोळचे माजी आमदार आहेत. तर माढा विधानसभेसाठी अभिजीत पाटील हे भाजपचे एकनिष्ट आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. तेही या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. स्वत: शरद पवार इच्छुकांच्या मुलाखती घेत आहेत, त्यामुळे या दोघांच्या बाबतीत ते आता काय निर्णय घेतील हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अंबरनाथ पश्चिमेत भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार, शहरात खळबळ

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

SCROLL FOR NEXT