Eknath Shinde operation tiger news 
Video

Maharashtra Politics : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक धक्का, आदित्य ठाकरेंच्या विश्वासू नेत्याला फोडलं?

Uddhav Thackeray : आदित्य ठाकरे यांचा विश्वासू आणि खांद्याला खांदा लावून काम कऱणारा नेता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजतेय. आज ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Eknath Shinde operation tiger news : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जबरी धक्के बसत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कोकणसह राज्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नुकताच राजन साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातून ठाकरे सावरत नाहीत, तोच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे रूपेश कदम शिंदेंच्या शिंदेंच्या युवासेनामध्ये प्रवेश करणार असल्याचे समजतेय.

आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा खंदा कार्यकर्ता शिंदेंच्या सेनेत आज जाण्याची शक्यता आहे. युवा सेनेचे माजी सदस्य रूपेश कदम गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभु यांना तिकिट दिल्यामुळे रूपेश कदम नाराज होते. ते आता जय महाराष्ट्र करण्याची शक्यता आहे. रूपेश कदम हे आदित्य ठाकरेंच्या सर्वात जवळचे कार्यकर्ते समजले जात आहेत. ते शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे समजतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

Til Ladoo Recipe : तिळाचे लाडू नेहमी कडक होतात? ट्राय करा 'ही' रेसिपी

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ

Famous Actress Wedding : 'क्यूंकी सास भी...'; फेम अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा खास PHOTOS

Ladki Bahin Yojana: अजूनही eKYC केली नाही,लाडक्या बहि‍णींना नोव्हेंबरचे ₹१५०० येणार की नाही? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT