State government announces a major decision removing Aadhaar as valid proof for birth date verification Saam Tv
Video

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Aadhaar Card Not Valid Proof: महाराष्ट्र सरकारने आधारकार्डचा जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वापर रद्द केला आहे. आधारवर आधारित उशिरा नोंद जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्यात येणार असून बनावट प्रमाणपत्रांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

Omkar Sonawane

राज्य सरकारने आधारकार्ड हा जन्मतारखेचा पुरावा म्हणून स्वीकारणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बनावट जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रे रोखण्यासाठी तसेच बेकायदेशीर कामांना आळा घालण्यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयानुसार केवळ आधारकार्डच्या आधारे तयार केलेली सर्व विलंबित जन्म प्रमाणपत्रे आता रद्द केली जाणार आहेत. इतकेच नाही तर अशी प्रमाणपत्रे जारी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून बोगस प्रमाणपत्रांचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. यापुढे जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधारकार्ड ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांना इतर अधिकृत कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. प्रशासकीय पारदर्शकता आणण्यासाठी आणि फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार, तब्बल 10 वर्षांचा तुरुंगवास

Maharashtra Politics: वाजलं म्हणून महायुतीचं लगेच काही तुटत नाही…|VIDEO

Kobbari Mithai: काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग खोबऱ्याची ही डीश बनवा घरीच, वाचा सोपी रेसिपी

पालिका निवडणुकीत पैशांचा पूर? तुमच्या मताचा रेट किती?

SCROLL FOR NEXT