Majhi Ladki Bahin Yojana saam tv
Video

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

Majhi Ladki Bahin Yojana Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाखो लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्हा परिषदेच्या जवळपास हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

Nandkumar Joshi

संदीप नागरे, हिंगोली | साम टीव्ही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. मागील विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळं महायुतीला फायदा झाला. पण या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचे उघड झालेले आहे. आतापर्यंत लाखो अपात्र लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. आता या अपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे बंद झाले आहे. त्यात आता आणखी एक प्रताप उघड झाला आहे.

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचं समोर आलेय. राज्यभरातील 1183 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने राज्य सरकारला दिलीय. सरकारने या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना दिले आहेत. हिंगोली जिल्हा परिषदेच्या सीईओ अंजली रमेश यांनी यासंदर्भात तातडीने कारवाई देखील सुरू केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toll Tax : खराब रस्त्यांवर टोल वसुली नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra Rain Live News : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

‘कौन बनेगा करोडपती 17’ ला पहिला करोडपती मिळाला; उत्तराखंडाचा आदित्य कुमारने जिंकली इतकी रक्कम

Viral Video : गोळ्या घालेन... पिस्तूल रोखत धमकावले, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बड्या नेत्याचा कार वर्कशॉपमध्ये राडा

House Renting: घर भाड्याने देताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT