फेसबुकवरील व्हिडिओ अवडलाय? असा करा डाउनलोड saam tv
स्पॉटलाईट

फेसबुकवरील व्हिडिओ आवडलाय? असा करा डाउनलोड

फेसबुक वरुन व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तेसे बरेच अ‍ॅप्स आहेत. परंतु, आपण सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फेसबुकवर(Facebook ) स्क्रोल करत असताना कधीकधी आपल्याला एखादा व्हिडिओ (Vedio) आवडतो. तो ऑनलाइन (Online) शेयर करायचा असेल तर फक्त शेयरचे एकच बटन दाबावे लागते. परंतु, जर तुम्हाला ते ऑफलाईन (Offline0 शेयर करायचे असल्यास ते तो व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करावा लागतो. मात्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये डाउनलोड करून सेव्ह करायचा असेल तर तुम्ही तो कसा करणार? (Like a video on Facebook? Do this download)

फेसबुक वरुन व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तेसे बरेच अ‍ॅप्स आहेत. परंतु, आपण सावधगिरी बाळगणेही आवश्यक आहे, कारण जर तुम्ही तसे केले नाहीतर तुमच्यावर सायबर अटॅक होण्याची सर्वाधिक शक्यता असते. अशा परिस्थितीत कोणत्याही अ‍ॅपचा वापर न करता तुम्ही थेट तो व्हिडिओ कसा डाउनलोड करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोणत्याही अ‍ॅप्सचा वापर न करता असं डाउनलोड करा फेसबुकवरचा व्हिडिओ

Android मोबाइलमधून असा डाउनलोड करा व्हिडिओ :

- फेसबुक अॅप वर जा आणि तुम्हाला जो व्हिडिओ डाऊनलोडकरेचा आहे त्यावर टॅप करा.

-तुम्हाला त्याखाली शेयर'चा ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन दिसतील तयावरून व्हिडिओची लिंक कॉपी करा.

- त्यानंतर आपल्या फोनमध्ये वापरलेल्या ब्राउझरवर जा आणि fbdown.net सुरू करा

-fbdown.netवर जाऊन याठिकाणी टी लिंक पेस्ट करा आणि डाऊनलोड करा.

-हे पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला दोन पर्याय दिसतील. पहिलं पर्याय असेल तो, सामान्य गुणवत्तेत व्हिडिओ डाउनलोड करा आणि दूसरा पर्याय असेल तो एचडी गुणवत्तेत डाउनलोड करा. याठिकाणी तुम्हाला ज्या गुणवत्तेत व्हिडिओ डाऊनलोड करायचं असेल तो पर्याय निवडा आणि त्यावर क्लिक करा.

यानंतर आपला व्हिडिओ प्ले होईल. यानंतर व्हिडिओच्या खाली दिसणार्‍या तीन ठिपक्यांवर टॅप करा, या क्लीकवर तुम्हाला व्हिडिओ डाऊनलोडचा पर्याय मिळेल.

- डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करा, हळूहळू हा व्हिडिओ डाउनलोड होईल. एकदा डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमच्या Android फोनमधील डाउनलोड फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता.

आयफोनमध्ये फेसबुकवरील व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठीदेखील याच पद्धती वापरा. आयफोनमध्येव्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी फक्त सफारी ब्राउझरचा वापर करावा लागेल आणि फोटो अ‍ॅपमध्ये डाउनलोड केलेला व्हिडिओ पाहावं लागेल.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT