चीनमधील आशियाई हत्तीचा एक मोठा कळप प्रवासाठी निघाला आहे. हा कळप नेमका कुठे जायला निघाला आहे, याबाबत सध्या ठोस माहिती नाही. परंतु गेल्या 15 महिन्यामध्ये या हत्तीनी 500 किलोमीटरचा प्रवास केला आहे. परंतु चीनमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या हत्तीचा प्रवास थांबला आहे. (A herd of elephants went on a world tour - watch the video)
यादरम्यान हा हत्तीचा कळप जियांग जिल्ह्यामधील जंगलात झोपलेले आढळून आले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रचंड प्रमाणात व्हायराल झाला आहे. या हत्तीचा कळप नेमका कुठे चालला आहे याची माहिती नसली तरी , व्हायरल व्हिडिओमुळे या हत्तीना जगभरात प्रसिद्धी मिळाली आहे.
हे देखील पहा -
जंगलामध्ये झोपलेल्या हत्तीच्या कळपाचा व्हायरल व्हिडिओ वनविभागाचे अधिकारी (Indian Forest Officer ) परविण कासवान यांनी शेअर केला आहे. "आज इंटेरनेटवर झोपलेल्या हत्तींचा कळप ही गोष्ट सर्वात खास आहे," असं व्हिडिओला कॅप्शन देतांना म्हंटले आहे. या व्हिडिओला दोन हजाराहून अधिक वेळा लाइक केले आहे.
बीबीसी आणि रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार , या हत्तींच्या कळपावर चीनचे अधिकारी लक्ष ठेवून आहे. या हत्तींचा कळप अनेक शहरामधून, शेतांमधून चालत आले आहेत. शेतांमधून येताना त्यांनी शेतमालचे भरपूर नुकसान केले आहे. परंतु स्थानिक सरकारने या हत्तीच्या कळपाला संरक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या हत्तीच्या कळपावर नजर ठेवण्यासाठी 14 ड्रोन्सचा वापर करण्यात येत आहे.
तसेच 500 लोकांना या हत्तीना योग्य तो आहार मिळवा यासाठी काळजी घेण्याची जबाबदारी दिली आहे. या हत्तींच्या कळपाला नैऋत्य दिशेकडील जंगलांमध्ये नेण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी रस्त्यावरील वाहतूक थांबवली जात आहे.
या हत्तींच्या कळपामध्ये तीन लहान हत्तीसह 15 हत्ती आहेत. यामध्ये 6 मादी , 3 नर , 3 लहान हत्ती आणि 3 अगदी लहान हत्ती आहेत. सध्या या हत्तींच्या कळपावर युन्नान फॉरेस्ट फायरफायटिंग ब्रिगेड लक्ष ठेवून आहे.
या हत्तींचा मार्ग बदलण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला होता. परंतु त्यांचा तो प्रयत्न अपयशी ठरला. पण आता हत्तींचा कळप पुन्हा नैऋत्यकडील जिशू आंगबन्ना येथील मेंग्यागजी पार्ककडे जातांना आढळून आले आहे. चीन या देशात फक्त 300 हत्तींचे अस्तित्व आहे.यामुळेच या हत्तींच्या कळपाची विशेष काळजी घेतली जात आहे.
Edited By - Puja Bonkile
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.