lonavla  
स्पॉटलाईट

कोरोना काळात मावळमध्ये अवतरला एक देवदूत ! केले पाचशे पेक्षा जास्त अंत्यविधी

औरंगाबादहून माधव सावरगावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मावळ : कोरोना Corona काळात एकीकडे माणुसकी Humanity हरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मात्र काहीजण मानवतेच्या क्षितिजापलीकडे जाऊन मानवतावादी काम करत असल्याचे चित्र आहे. He Performed More than five hundred funerals

500 पेक्षा अधिक मृतदेहाला Death Bodies अग्नी देत मुलासारखे कर्तव्य निभावणारा पीपीई किटच्या आतला देवदूत लोणावळ्यात अवतरला आहे. गेली दीड वर्षं तो रात्रंदिवस कोरोना साथीच्या महाभयंकर रोगात मृत्युमुखी झालेल्या रुग्णाला वैंकुठ लोकी सन्मानाने पाठवण्याची जबाबदारी पार पाडत आहे.

कोणाचा मुलगा होऊन तर कधी भाऊ,काका,पुतण्या, मामा आजोबांच्या रूपाने आपलं कर्तव्य पार पाडत आहे. मावळ मधील लोणावळा परिसरातील पाचशे च्या जवळपास मृतदेहावर अंतिम संस्कार Funreral  करणारा विजय साळवे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. He Performed More than five hundred funerals

मावळ मधील लोणावळा Lonavala नगरपालिकेत Muncipality आरोग्य खात्यात काम करणारे विजय साळवे यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी दिली असता सुरवातीला त्यांच्या जीवाची घालमेल झाली होती.

तरी जीवावर उदार होऊन साळवे यांनी या कामाचे आव्हान स्वीकारले,मात्र काम तर हाती घेतलं पण मदतनीस कोणीच पुढे येत नव्हते, हळू हळू त्यानी सवंगड्यांना विश्वासात घेऊन आज पर्यंत पाचशे च्या आसपास कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. He Performed More than five hundred funerals

यात सर्व धर्मीय मृतदेह होते. कोरोना काळात देखील मानव जातीच्या सेवेसाठी अनेक देवदूत पीपीई किटच्या आतून कार्यरत आहेत. मात्र विजय साळवे नावाचा असाच एक देवदूत पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यात आपली सेवा बजावत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या आदेशाने लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भुशीगाव स्मशानभूमी ही कोरोनाबाधित व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी राखीव करण्यात आली. He Performed More than five hundred funerals

नगरपरिषदेने या स्मशानभूमीची संपूर्ण जबाबदारी विजय साळवे यांच्यावर सोपविली. त्यांच्या मदतीसाठी एक टीम देखील तैनात करण्यात आली. हिंदू समिती तसेच सत्यनारायण ट्रस्ट या सामाजिक संस्था याकामी विजय साळवे यांना निश्चितच मदत करत आहेत. मात्र या कामाची संपूर्ण जबाबदारी ही विजय साळवी यांचीच असते.

चोवीस तासात कधीही, मग ती मध्यरात्र असो वा पहाट असो किंवा दिवसभरात कोणतीही वेळ असो, एखादा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी साठी येणार असेल तर सर्वप्रथम त्याची माहिती विजय साळवे यांना दिली जाते. He Performed More than five hundred funerals

माहिती मिळताच हाताखालील माणसे जमा करणे, अंत्यसंस्कारासाठी सरपण तसेच इतर आवश्यक समानाची जमवाजमव करणे, नगरपरिषदेमधून पीपीई किट आणणे, मृतदेह शववहिनी मधून उतरवून घेणे, सरपण रचणे, मृतदेहाला अग्निडाग देणे, जोपर्यंत मृतदेह संपूर्ण जळत नाही तोपर्यंत लक्ष देणे, सर्व झाल्यावर राख जमा करणे, नातेवाईकांना अस्थी जमा करून देणे ही सर्व कामे विजय साळवी स्वतः कोणी सोबत असो वा नसो, अत्यंत जबाबदारीने करतात.

विजय नावाप्रमाणे त्यांच्या कामाचा झंझावात सुरु आहे. त्यामुळे अशी क्वचितच मुलखा वेगळी माणसं आपला ठसा उमटवून जागृत आहेत. त्यांना नगरपालिकेकडून पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

हे देखील पहा -

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT