suraiya dev anand.jpg
suraiya dev anand.jpg 
स्पॉटलाईट

Happy Birthday suraiya : सुरैय्या आणि  देव आनंद यांच्या प्रेमाची अधुरी एक कहाणी.. 

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय चित्रपट सृष्टीला Indian Film Creation  अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने वेगळी  एक ओळख निर्माण करून दिली आहे.  चित्रपट सृष्टीने अनेक दिग्गज कलाकार तयार केले तर अनेकजण काळाच्या ओघात मागेही पडले. 1950 -60च्या दशकात  सुरैय्या Suraiya हिंदी चित्रपट जगात एक उत्तम गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. सुरैय्या यांनी  आपल्या मधुर आवाज आणि भव्य अभिनयातून बरीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आज सुरैय्या यांचा वाढदिवस.  15 जून 1929 रोजी पंजाबमधील मुस्लिम कुटुंबात सुरैय्या यांचा जन्म झाला होता. सुरैय्या दिसायला  खूपच सुंदर होती. जर एखाद्याने त्यांच्याकडे पाहिले  तर, मग त्याची नजर सुरैय्या यांच्यावरून हटतच नसे.  ज्येष्ठ अभिनेते देव आनंदही त्याच्या सौंदर्यावर असेच भाळले होते.  हिंदी चित्रपट सृष्टीत  सुरैय्या आणि देव आनंद Dev Anand यांच्या प्रेमच्या अनेक कथा अजूनही इंडस्ट्रीमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.  (Happy Birthday suraiya: An incomplete story of love between Suraiya and Dev Anand ..) 

  • देव आनंद यांनी  सूरैय्या यांचा जीव वाचवला 

विद्या या चित्रपटाचे शूटिंग चालू होते. यामध्ये एका सीनचे  चित्रकरण  नावेवर करायचे होते.  सुरैय्या नावेत बसल्या होत्या. नाव काही अंतरावर गेल्यानंतर नाव पाण्यात उलटली आणि सुरैय्या पाण्यात बुडू लागल्या. हे पाहताच देव आनंद यांनी  धावतच पाण्यात उडी मारली आणि सुरैय्या यांचे प्राण वाचवले. यावेळी सुरैय्या देव आनंद यांना म्हणाल्या होत्या की,  ''तुम्ही मला वाचवले नसते तर आज माझा जीव गेला असता, त्याचवेळी देव आनंद त्यांना म्हणाले, तूला वाचवले नसते तर  आज माझाही जीव गेला असता.'' या घटनेनंतर जवळपास 40 वर्षांनंतर सुरैय्या यांनी  एका मुलाखतीत या अपघाताचा उल्लेख केला.  या घटनेवेळीच देव आनंद सुरैय्या यांच्या प्रेमात पडले होते. याच चित्रपटाच्या वेळी देव आनंद यांनी चित्रपटाच्या सेट्सवर सुरैय्या यांना  तीन हजार रुपये किंमतीची अंगठी देऊन प्रपोज केले होते.  

  • सुरैय्या आणि देव आनंद यांना करायचं होतं लग्न

एकत्र काम करत असताना सुरैय्या आणि देव आनंद एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही  एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सुरैया यांच्या आजीला हे नाते अजिबात मान्य नव्हते. स्लिम मुलीचे हिंदू मुलाशी असे कोणतेही नाते त्यांना मान्य नाही, असे त्यांच्या आईने त्यांना ठणकावून सांगितले होते. तर  देव आनंदसोबतच्या अफेअरच्या बातमीनंतर, चित्रपटाची  शूटिंग संपल्यानंतर  त्या कधीही देव आनंदशी बोलणार नाही, असा इशाराच  त्यांच्या आजीने त्यांना दिला होता. घरातील सदस्यांचा कडकपणा पाहून सुरैय्या आणि देव आनंद यांनी सेटवरच लग्न करण्याच्या निर्णय घेतला. 

  • आजीने सुरैय्या यांना ओढतच सेटवरून घेऊन गेल्या 

सुरैय्या  आणि देव आनंद यांनी चित्रपटाच्या सेटवरच  लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांसाथी त्यांनी  सेटवर खऱ्या ब्रम्हणाला  बोलावून खरे लग्न लावण्याची योजना करण्यात आली. मात्र तितक्यात सुरैय्या यांच्या सहाय्यकाने  त्यांच्या आईला याबाबत सांगितले. त्यावेळी  सुरैय्या यांची आजी सेटवर आली आणि त्यांना  ओढतच आपल्याबरोबर घरी घेऊन गेली. 

  • कुराणवर हात ठेवून  सूरैय्या यांना  शपथ घ्यायला लावली 

देव आनंद यांच्याशी  लग्न करणे ही त्यांची सर्वात मोठी चूक ठरू शकते, हे पटवून देण्यासाठी  चित्रपट सृष्टीतिल अनेक कलाकार त्यांच्या घरी बोलावले जात होते. एक वेळी तर अभिनेत्री नादिराचे पहिले  पती नकशब यांनी सुरैय्या यांच्यासमोर कुराण ठेवून देव आनंद यांच्याशी लग्न न करण्याची शपथच घ्यायला लावली.  धक्कादायक म्हणजे जर त्यांनी देव आनंद यांच्याशी लग्न केले तर  देशात दंगली पेटतील अशी भीती त्यांना दाखवण्यात आली. ज्यामुळे त्या खूपच घाबरून गेल्या होत्या.  मात्र  त्यांच्या आजी आणि मामाने देव यांना जीवे मारण्याची धमकी दिली,  तेव्हा त्या खूपच खचून गेल्या.  अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे  देव आनंद आणि सुरैय्या यांचे मार्ग कायमचे  वेगळे झाले.  या नंतर त्यांनी त्यांच्याशी कधीही संपर्क साधला नाही. मात्र त्यांनी आयुष्यभर  कोणाशी लग्नही केले नाही.  

Edited By- Anuradha Dhawade 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये पवार विरुद्ध पवार! अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात

Health Tips: रात्री झोपण्यापूर्वी चालल्याने काय फायदा होतो?

Onion Export: 'साम' च्या बातमीचा इम्पॅक्ट; आता गुजरातसोबत महाराष्ट्रातल्या कांद्याचीही निर्यात

Ujjwal Nikam At Siddhivinayak Temple | उज्ज्वल निकम उमेदवारीनंतर सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

Maharashtra Politics | माढ्यात Sharad Pawar गटाला धक्का! Dhaval Singh Mohite Patil भाजपमध्ये जाणार?

SCROLL FOR NEXT