sushant singh.jpg 
स्पॉटलाईट

दिल्ली उच्च न्यायालयाने सुशांतसिंगच्या वडिलांची याचिका फेटाळली

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था :  दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court बुधवारी (9 जून)  दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या Sushantsingh Rajput  जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळून लावली आहे.  त्यामुळे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुशांतसिंगच्या वडिलांनी  कृष्ण किशोर सिंग यांनी  न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. न्याय: द जस्टिस याचित्रपटात सुशांतच्या नावावर किंवा जीवनावर आधारित चित्रपट नसल्याने न्यायालयाने सुशांतच्या वडिलांची ही याचिका फेटाळून लावली आहे. उद्या म्हणजे 11 जूनला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  (The Delhi High Court has rejected the plea of Sushant Singh's father)  

न्यायालायाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती संजीव नरुला यांच्या खंडपीठसमोर याप्रकरणी सुनावणी पार पडली. या चित्रपटाद्वारे आपल्या दिवंगत मुलाची प्रतिमा खराब केली जात असल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. तर चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या वतीने ज्येष्ठ वकील चंदर लाल यांनी न्यायालयात बाजू मांडली. चित्रपटाच्या प्रदर्शनाचा व्यापक प्रसार झाला आहे आणि म्हणूनच तो मागे घेण्याबाबत कोणतेही आश्वासन देऊ शकत नसल्याचे म्हटले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने अखेर आज सुशांतच्या वडिलांची  याचिका फेटाळून लावली. 

दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या प्रकरणी निकाल राखून ठेवला. कोर्टाच्या निर्णयापर्यंत न्यायाधीशांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला चित्रपट प्रदर्शित न करण्यास सांगितले. 11 जूनपूर्वी न्यायालय आपला निर्णय देण्याची दाट शक्यता आहे. पण, जर तसे झाले नाही तर सिनेमा रिलीज करण्याचे वेळापत्रक मागे घेण्यात येईल, असे न्यायमूर्ती संजीव नरूला यांनी म्हटले होते. दरम्यान सुशांतसिंग राजपूतने 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. या घटने नंतर संपूर्ण चित्रपट सृष्टीत चांगलीच खळबळ मजली होती. 

Edited By - Anuradha Dhawade 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हिंगोलीत बाजार पेठेत चाकूहल्ला

India Vs England : शुभमन गिल ठरला नंबर १ कॅप्टन; सुनील गावसकर, विराट कोहलीलाही टाकलं मागे

Bhagavad Gita: भगवद्गीतेच्या नवव्या अध्याय कोणती शिकवण मिळते?

Badlapur News: बदलापूर रेल्वे स्टेशनला जुनेच सरकते जिने? प्रवाशांची फसवणूक, VIDEO

Pune : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दारूड्या तरुणाला अटक, पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT