zimbabwe cricket team twitter
क्रीडा

IND vs ZIM: टीम इंडियाला आव्हान देण्यासाठी झिम्बाब्वेचा संघ जाहीर! ट्रिपल सेंच्युरी मारणाऱ्या फलंदाजाला संघात स्थान

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील घवघवीत यशानंतर भारतीय संघाने २०२६ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची तयारी सुरु केली आहे. वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. दरम्यान झिम्बाब्वेनेही या मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

या संघात आक्रमक फलंदाज अंतुन नकवीला स्थान देण्यात आलं आहे. या २५ वर्षीय फलंदाजाने याच वर्षाच्या सुरुवातीला झिम्बाब्वेकडून खेळताना तिहेरी शतकी खेळी केली होती. हा खेळाडू झिम्बाब्वेचा नसून दुसऱ्या देशाचा आहे. त्याचा जन्म बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये झाला. त्यानंतर त्याचं कुटुंब ऑस्ट्रेलियाला गेलं.

मात्र अंतुनला झिम्बाब्वेकडून खेळायचं होतं. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मिड वेस्ट रायनोज संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना त्याने १४६.८० च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ७३.४२ च्या आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७२.०० च्या शानदार सरासरीने धावा केल्या आहेत.

असं आहे वेळापत्रक

भारतीय संघातील खेळाडू झिम्बाब्वे दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना ६ जुलै, दुसरा सामना ७ जुलै, तिसरा सामना १० जुलै, चौथा सामना १३ जुलै आणि पाचवा सामना १४ जुलै रोजी खेळला जाणार आहे. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४:३० वाजता सुरु होणार आहे. हे सामना सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत.

या मालिकेसाठी असा आहे झिम्बाब्वेचा संघ:

रजा सिकंदर (कर्णधार), अकरम फराज, बेनेट ब्रायन, कॅम्पबेल जॉनथन, चतारा टेंडाई, जोंगवे ल्यूक, काइया इनोसेंट, मडेंडे क्लाइव, मधेवेरे वेस्ली, मारुमानी तदीवानाशे, मसाकाद्जा वेलिंगटन, मावुता ब्रँडन, मुजाराबानी ब्लेसिंग, मायर्स डायन, नकवी अंतुम, नगारवा रिचर्ड, शुम्बा मिल्टन.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

SCROLL FOR NEXT