saim ayub twitter
Sports

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Saim Ayub Record: पाकिस्तानचा स्टार फलंदाज सॅम अयूबने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Zimbabwe vs Pakistan, Saim Ayub Record: पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दमदार कमबॅक करत झिम्बाब्वेवर १० गडी राखून विजय मिळवला आहे.

या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर जिंकण्यासाठी १४६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून सॅम अयूबने तुफानी शतकी खेळी केली.या खेळीच्या बळावर त्याने पाकिस्तानला एकहाती विजय मिळवून दिला.

सॅम अयूबची वादळी शतकी खेळी

गेल्या सामन्यात झिम्बाब्वेकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाने या सामन्यात दमदार कमबॅक केलं. पराभवाचा वचपा काढत पाकिस्तानी फलंदाजांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या सॅम अयूबने चौफेर फटकेबाजी करत अवघ्या ५३ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. हे त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक ठरले आहे. यासह हे पाकिस्तानसाठी तिसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे.

पाकिस्तानसाठी सर्वात वेगवान शतक झळकावणारे फलंदाज

शाहिद आफ्रिदी - ३७ चेंडू, श्रीलंका

शाहिद आफ्रिदी -४५ चेंडू, भारत

शाहिद आफ्रिदी - ५३ चेंडू , बांगलादेश

सॅम अयूब - ५३ चेंडू, झिम्बाब्वे

शरजील खान - ६१ चेंडू, आयर्लंड

सॅम अयूबची तुफान फटकेबाजी

झिम्बाब्वेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना अयूबने ६२ चेंडूंचा सामना करत ११३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि १७ चौकार खेचले. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला गमवावा लागला होता.

आता हा सामना जिंकून पाकिस्तानने ही मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. यासह सॅम अयूबच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. वनडे क्रिकेटमध्ये १५० धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याही फलंदाजाला असा कारनामा करता आला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

SCROLL FOR NEXT