Shahid Afridi: 'पाकिस्तानात येऊन तर बघ..' विराट कोहलीबाबत बोलताना काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

Shahid Afridi On Virat Kohli: भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नाहीये. मात्र याबाबत आता शाहिद आफ्रिदीने मोठं वक्तव्य केलं आहे.
Shahid Afridi: 'पाकिस्तानात येऊन तर बघ..' विराट कोहलीबाबत बोलताना काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
shahid afridi on virat kohlitwitter
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने आपली भूमिका जवळजवळ स्पष्ट केली आहे. पाकिस्तानने भारतीय संघाला पाकिस्तानात येऊन खेळण्याचं आमंत्रण दिलं आहे. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात येण्यावर पाठ फिरवली आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत खेळवले जाऊ शकतात. दरम्यान या चर्चा सुरु असताना पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठं वक्तव्य केलं आहे.

आफ्रिदीचं म्हणणं आहे की, भारतीय संघाने पाकिस्तानात येऊन खेळावं. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेटमधील संबंध आणखी चांगले होतील. यासह पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांना विराट कोहलीला लाईव्ह खेळताना पाहण्याची संधी मिळेल.

विराट कोहलीची फॅन फॉलोइंग ही जगभर पसरलेली आहे. भारतासह पाकिस्तानातही त्याचे लाखो फॅन्स आहेत. ही विराट कोहलीसाठी भारतीय संघाकडून खेळताना पहिली आणि शेवटची संधी असू शकते. कारण विराटला याआधी पाकिस्तानात खेळण्याची संधी मिळालेली नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इथून पुढे तो केवळ, वनडे, कसोटी आणि आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे.

Shahid Afridi: 'पाकिस्तानात येऊन तर बघ..' विराट कोहलीबाबत बोलताना काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
IND vs ZIM 3rd T20I: गिल-वॉशिंग्टनने मिळवून दिला 'सुंदर' विजय; हरारेमध्ये झिम्बाब्वेचा २३ धावांनी पराभव

काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?

शाहिद आफ्रिदीने न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' मी भारतीय संघाचं स्वागत करेल. इतकेच नव्हे तर, आम्ही जेव्हा भारत दौऱ्यावर गेलो आहे, तेव्हा आम्हालाही प्रेम आणि आदर मिळायचा. जेव्हा २००५-०६ मध्ये भारतीय खेळाडू पाकिस्तानात आले होते, त्यावेळी त्यांनी ही इथे खेळण्याचा आनंद घेतला होता. जर विराट कोहली पाकिस्तानात आला, तर तो भारतातून मिळणारं प्रेम आणि पाहुणचार विसरेल. तो उच्च स्तरीय खेळाडू आहे.'

Shahid Afridi: 'पाकिस्तानात येऊन तर बघ..' विराट कोहलीबाबत बोलताना काय म्हणाला शाहिद आफ्रिदी?
Team India Coach: बॉलिंग कोच म्हणून गौतम गंभीरने दक्षिण आफ्रिकेच्या या दिग्गजाचं सुचवलं नाव; वाचा आहे तरी कोण?

पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांनी असं गृहीत धरलं आहे की, भारतीय संघ पाकिस्तानात येऊ शकतो. मात्र बीसीसीआयने पाकिस्तानात जाण्याला रेड सिग्नल दिला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने आयसीसीकडे, ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये खेळवण्याची मागणी केली आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवले जाऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com