Yuzvendra Chahal walked out at No.10, but the Indian team wanted Mukesh Kumar ind vs wi 1st t20 amd2000 saam tv
क्रीडा

Yuzvendra Chahal: ‘दिलसे बुरा लगता है भाई!’ बॅटिंगला जात असलेल्या चहलसोबत नेमकं काय घडलं? पाहा PHOTO

IND vs WI 1st T20: या सामन्यात युझवेंद्र चहलसोबत असा काही प्रकार घडला आहे जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

Ankush Dhavre

Funny Moments In Cricket: त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिला टी -२० सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. १५० धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आहे.

दरम्यान या सामन्यात युझवेंद्र चहलसोबत असा काही प्रकार घडला आहे जो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना युझवेंद्र चहल १० व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.

मात्र संघ व्यवस्थापकांचं असं म्हणणं होतं की, १० व्या क्रमांकावर युझवेंद्र चहलने नव्हे तर मुकेश कुमारने जायला हवं. त्यामुळे चहल माघारी फिरला. मात्र तो आधी मैदानात उतरल्यामुळे त्याला नाईलाजाने फलंदाजी करण्यासाठी जावं लागलं.

अशाप्रकारे युझवेंद्र चहल १० व्या क्रमांकावर फलंदाजी करायला गेला. तर पदार्पणवीर मुकेश कुमार ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता.

ही मजेशीर घटना २० व्या षटकात घडली जेव्हा कुलदीप यादव बाद होऊन माघारी परतला होता. शेवटी युझवेंद्र चहल आणि मुकेश कुमार हे दोघेही १-१ धावांवर नाबाद राहिले. (Latest sports updates)

युझवेंद्र चहलची उत्कृष्ट गोलंदाजी...

भारतीय संघाकडून युझवेंद्र चहलने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने या सामन्यात ३ षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने २४ धावा खर्च करत २ गडी बाद केले. त्याने या सामन्यात सलामीवीर फलंदाज ब्रँडन किंग आणि काईल मेयर्सला बाद करत माघारी धाडले.

धावांचा पाठलाग करण्यात भारतीय संघ अपयशी..

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २० षटकात १५० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला अवघ्या १४५ धावा करता आल्या. भारतीय संघाकडून तिलक वर्माने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली.

तर सूर्यकुमार यादवने २१ आणि कर्णधार हार्दिक पंड्याने १९ धावांची खेळी केली. भारतीय संघाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ६ धावांची गरज होती. मात्र फलंदाजीला असलेला मुकेश कुमार षटकार मारू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT