Yuzvendra Chahal quit alcohol for fitness saam tv
Sports

IPL 2026: IPL सुरू होण्याआधी दारू सोडली, दिग्गज खेळाडूनं एबीसमोर सांगितलं कारण

Yuzvendra Chahal quit alcohol for fitness: युजवेंद्र चहलने आयपीएल 2026 पूर्वी फिटनेससाठी मोठा निर्णय घेत दारू सोडली आहे. दुखापतींवर मात करत टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी तो सज्ज झालाय.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा स्पिनर युजवेंद्र चहल याने त्याच्या पर्सनल लाईबाबत एक मोठा खुलासा केलाय. यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये तो पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. अशातच लीग सुरू होण्यापूर्वी चहल स्वतःच्या फिटनेसवर खास लक्ष देताना दिसतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी मेहनत करत असलेल्या चहलने एबी डिविलियर्सच्या यूट्यूब शोमध्ये सांगितलं की, त्याने दारू पूर्णपणे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने दारूला हात लावलेला नाही. हे ऐकून डिविलियर्सनेही त्याचं कौतुक केलंय.

फिटनेस टिकवणं चहलसमोर मोठं आव्हान

३५ वर्षांचा झाल्यानंतर फिटनेस टिकवणं हे चहलसाठी मोठं आव्हान बनलं होतं. यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता. याबाबत बोलताना तो म्हणाला, “मी दारू पिणं सोडलं आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ झाला, मी दारूला स्पर्शही केलेला नाही. आता वय वाढत असल्यामुळे शरीराची अधिक काळजी घ्यावी लागते. मला माझ्या टीमसाठी १५० टक्के योगदान द्यायचंय. मी सिनीयर खेळाडू असल्यामुळे तरुणांनी माझ्याकडून काहीतरी शिकावं, ही माझी इच्छा आहे.”

गेल्या सिझनमध्ये अंतिम सामन्याबद्दलही चहलने त्याचं मत व्यक्त केलं. त्याने सांगितलं की, मार्को यानसेन टीममध्ये नसल्याचा मोठा फटका बसला. फायनलच्या आधी यानसेन आपल्या देशात परतला होता कारण त्याला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी तयारी करायची होती.

पंजाब किंग्स संघ गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफीच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू कडून ६ रन्सने पराभव पत्करावा लागला. चहलच्या मते, “जर यानसेन टीममध्या असता तर आम्ही नक्कीच जिंकलो असतो. त्याची गोलंदाजी आणि आक्रमक फलंदाजी टीमसाठी खूप महत्त्वाची होती.”

चहलने आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. त्याने सांगितलं की, गेल्या सिझनच्या शेवटी तो दुखापतींशी झुंजत होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या बरगड्यांना फ्रॅक्चर झालं होतं. त्यानंतर त्याच्या हाताच्या बोटालाही दुखापत झाली.

या कारणामुळे तो सेमीफानयल आणि अंतिम सामन्यात तो लेग-स्पिनने गोलंदाजी करू शकला नाही. आता मात्र चहलने ठरवलंय की फिटनेसलाच प्राधान्य देत पंजाब किंग्सला पहिलं आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्याने नमूद केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pani Puri Pani Recipe: स्ट्रीट स्टाईल चटपटीत पाणीपुरीचे पाणी घरी कसं बनवाल? 'ही' आहे सीक्रेट रेसिपी, खाणारे खातच राहतील

LPG गॅसचं पहिलं एटीएम आलं, आता मिनिटात फुल करा सिलिंडर, वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यात गुढी पाडव्यानिमित्ताने 12 हजार वाहनांची खरेदी

Mangalsutra Designs For Bride: सिंपल टू मॉडर्न, नव्या नवरीसाठी मंगळसूत्राच्या या लेटेस्ट 5 डिझाईन्स

Dhurandhar 2: अल्लू अर्जुन ते अनन्या पांडे; चाहत्यांसह आता सेलिब्रिटींमध्येही 'धुरंधर 2'ची क्रेझ

SCROLL FOR NEXT