Indian cricket team saam tv
Sports

Team India Playing XI: कुलदीप किंवा चहलची एन्ट्री कन्फर्म ; कोण होणार बाहेर? राहुल द्रविडने दिली हिंट

Rahul Dravid On Team India Playing XI: भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुलदीप किंवा चहलला एन्ट्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामन्यांमध्ये ४ सामने खेळले. या ४ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. तर १ सामना हा पावसामुळे रद्द केला. या चारही सामन्यांमध्ये कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलला बाकावर बसून राहावं लागलं आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहलपैकी एकाला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं,असे संकेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी दिले आहेत.

भारतीय संघाचे साखळी फेरीतील सामने न्यूयॉर्कमध्ये पार पडले. नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती. कारण चेंडू कधी उसळी घेत होता, तर कधी खालीच राहत होता. त्यामुळे फलंदाज अडचणीत येत होते. इथून पुढे भारतीय संघाचे सामने वेस्टइंडिजमध्ये होणार आहेत. राहुल द्रविड म्हणाले की, ' कोणालाही बाहेर ठेवण्याचा निर्णय घेणं खूप कठीण असणार आहे. न्यूयॉर्कमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती वेगळी होती. आम्हाला इथे (बारबाडोस) काहीतरी वेगळं करण्याची आवश्यकता भासू शकते. युजवेंद्र चहल किंवा कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते.'

तसेच ते पुढे म्हणाले की, 'आम्ही खूप नशिबवान आहोत की, आमच्याकडे अष्टपैलू खेळाडू आहेत. आमच्याकडे ८ फलंदाज होते. मात्र यासह गोलंदाजी करण्यासाठी ७ पर्याय देखील होते. परिस्थिती बदलत असते. त्याला तुम्ही काळ्या दगडावरची रेघ असं म्हणू शकत नाही. मला फ्लेक्सिब्लिटी हवी आहे. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात आम्ही अक्षर पटेलला वर पाठवलं. रिषभ पंतलाही वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवलं. हा निर्णय घेण्याआधी आम्ही खूप विचार केला आहे. ही फ्लेक्सिब्लिटी कसोटी क्रिकेटमध्ये नसेल. मात्र टी-२० क्रिकेटमध्ये पर्याय आहेत.'

सुपर ८ मध्ये भारतीय संघाचे सामने कोणत्या संघाविरुद्ध?

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप फेरीतील सुपर ८ फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. तर दुसरा सामना २२ जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. सुपर ८ फेरीतील तिसरा सामना २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT