ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल जवळपास प्रत्येक घरात किचन हे मॉड्युलर असते. हे किचन खूपच स्टायलिश आणि आरामदायक असतात.
सर्व मॉड्यूलर किचन स्टॅडिंग स्टाइलच्या रचनेत असतात. यामुळे कपाटांसाठी अधिक जागा मिळते.
जर तुम्हीही तुमच्या घरात मॉड्यूलर किचन बनवून घेत असाल, तर काही गोष्टी लक्षात ठेवा.
तुमच्या उंचीनुसार कपाट बनवून घ्या. खूप उंच कपाट बनवून घेऊ नका, नाहीतर तुम्हाला वस्तू काढताना अडचण येईल.
भांडी ठेवण्यासाठी वेगवेगळे स्टँड घ्या. ग्लास, प्लेट्स, वाट्या, चमचे. यामुळे भांडी एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत.
मसाल्यांचे डबे, डाळी आणि तांदळाचे डब्बे ठेवण्यासाठी एक मोठा कपाट निवडा आणि बनवून घ्या. ज्यामध्ये सर्व काही मावेल.
किचनमध्ये थोडी अतिरिक्त जागा ठेवा. किचनमध्ये अनेक वस्तू आणि भांडी असतात, ते ठेवण्यासाठी एक्स्ट्रा स्पेस असल्यास ठेवणे सोपे जाते.
तुम्ही तुमच्या भांड्यांसाठी एक स्वतंत्र कपाट बनवून घेऊ शकता. यामुळे तुमची भांडीकुंडी व्यवस्थित मांडली जातील आणि त्यांना एक आकर्षक स्वरूप मिळेल.
किचनमध्ये मिक्सर आणि मायक्रोवेव्हसाठीही जागा राखून ठेवा. नाहीतर, तुम्हाला या उपकरणांसाठी वेगळी जागा शोधावी लागेल.