भारतीय संघ आज टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत सुपर ८ फेरीतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना बारबाडोसच्या केसिंग्टन ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल.
साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघ अजेय आहे. आतापर्यंत भारतीय संघाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेला धूळ चारली आहे. आता अफगाणिस्तानला पराभूत करुन भारतीय संघ सेमीफायनलच्या दिशेने आगेकूच करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान?जाणून घ्या.
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना हा स्थानिक वेळेनुसार सकाळी १०:३० वाजता सुरु होईल. तर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होईल. accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत पाऊस पडणार नाहिये. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. मात्र सामन्याच्या शेवटी ढगाळ वातावरण असू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दोन्ही संघांनी या स्पर्धेत दमदार कामगिरी करत सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. मात्र दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ८ वेळेस आमनेसामने आले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर १ सामना हा अनिर्णित राहिला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.
अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जादरान, गुलबदीन नईब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारूकी, नजीबुल्लाह जदरान, करीम जनात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.