IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही! वाचा कसा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड

India vs Afghanistan,Head To Head Record: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये सुपर ८ फेरीतील पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान कसा राहिलाय रेकॉर्ड? वाचा.
IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही! वाचा कसा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड
ind vs afgtwitter

भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार आहे. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर १ सामना पावसामुळे रद्द केला गेला. भारतीय संघाचा पुढील सामना २२ जून रोजी बांगलादेशविरुद्ध तर २२ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दरम्यान भारत विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्यामध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी पाहिली तर भारतीय संघाने आतापर्यंत ३ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात आयर्लंडला पराभूत केलं. त्यानंतर पुढील सामन्यात पाकिस्तानचा दारुण पराभव केला. तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेला धूळ चारली. चौथा सामना कॅनडाविरुद्ध होणार होता. मात्र हा सामना पावसामुळे घुतला गेला.

IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही! वाचा कसा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs AFG, Playing XI: आज रंगणार भारत- अफगाणिस्तान सामन्याचा थरार! रोहित प्रमुख खेळाडूला बसवणार?

कसा राहिलाय रेकॉर्ड?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. भारतीय संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. तर एक १ सामना अनिर्णीत राहिला. हे दोन्ही संघ आता सुपर ८ मध्ये आमने सामने येणार आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात डबल सुपर ओव्हर झाली होती. त्यामुळे अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही.

IND vs AFG, Super 8: अफगाणिस्तानला हलक्यात घेऊन चालणार नाही! वाचा कसा राहिलाय हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs AFG, Super 8: अर्शदीप सिंगला नंबर 1 बनण्यासाठी 1 विकेटची गरज; रोहित अन् विराटमध्येही चुरशीची लढत

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज/कुलदीप यादव.

अफगाणिस्तान : रहमानुल्लाह गुरबाज (यष्टिरक्षक), इब्राहिम जादरान, गुलबदीन नईब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जदरान, करीम जनात, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारूकी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com