जॉन्टी रोड्स हा क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक शानदार झेल घेतले आहेत. यासह अविश्वसनिय रन आऊट्सही केले आहेत. दरम्यान लवकरच जॉन्टी रोड्सची भारतीय संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात एन्ट्री होऊ शकते.
मात्र याबाबत कुठलाही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही भारतीय संघाचा हेड कोच म्हणून राहुल द्रविडसाठी शेवटची स्पर्धा असणार आहे. माध्यमातील वृत्तांमध्ये असा दावा करण्यात येत आहे, की राहुल द्रविडनंतर ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवली जाऊ शकते.
जॉन्टी रोड्सने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०१९ त्याने या पदासाठी अर्ज केला होता. त्यावेळी बीसीसीआयने आर श्रीधरला या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावेळी रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यावेळी आर श्रीधर हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. सध्या राहुल द्रविड यांच्या कार्यकाळात टी दिलीप यष्टीरक्षण प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
जॉन्टी रोड्सने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी यष्टीरक्षण प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. सध्या तो लखनऊ सुपरजायंट्स संघासाठी ही जबाबदारी पार पाडतोय. २०२२ आणि २०२३ मध्ये गौतम गंभीरने लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे दोघांनाही एकत्र काम करण्याचा चांगला अनुभव आहे. यापूर्वी त्याने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स संघासाठी देखील क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे.
जॉन्टी रोड्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याला दक्षिण आफ्रिकेकडून ५२ कसोटी आणि २४५ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. एकाच वनडे सामन्यात सर्वाधिक ५ झेल टिपण्याच्या रेकॉर्डची नोंद ही जॉन्टी रोड्सच्या नावावर आहे. यासह जॉन्टी रोड्सने क्षेत्ररक्षक म्हणून सामनावीर म्हणून सामनावीर पुरस्कारही पटकावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.