yuzvendra chahal twitter
क्रीडा

टीम इंडियात डावलले, Yuzvendra Chahal ने घातला राडा; इंग्लंडमध्ये पदार्पणातच 'पंजा' उघडला!

Yuzvendra Chahal In County Cricket: युजवेंद्र चहल गेल्या काही वर्षांपासून शानदार कामगिरी करतोय. मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. दरम्यान काऊंटी क्रिकेटमधील पदार्पणात त्याने शानदार कामगिरी करुन दाखवली आहे.

Ankush Dhavre

Yuzvendra Chahal Took 5 Wickets Haul: भारतीय संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने भारतीय संघाकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तो भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे.

शानदार रेकॉर्ड असूनही त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान भारतीय संघातील खेळाडू विश्रांतीवर असताना युजवेंद्र चहलने इंग्लंडमध्ये राडा केला आहे. त्याने कांऊटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना शानदार पदार्पण केलं आहे.

१ तासापूर्वी मिळालं कॉन्ट्रॅक्ट

युजवेंद्र चहलला १ तासापूर्वी नॉर्थम्प्टनशायरकडून खेळण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला, त्यानंतर मैदानात उतरुन त्याने राडा घातला. आपल्या संघाला ९ गडी राखून विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. पहिल्याच सामन्यात त्याने केंट स्पिटफायर्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने १० षटक गोलंदाजी केली आणि १४ धावा करत ५ गडी बाद केले.

चहलची शानदार गोलंदाजी

विरोधी संघातील फलंदाजांकडे चहलच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. या सामन्यात त्याने ५ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. ज्यात जेडिन डेनली, एकांश सिंग, ग्रांट स्टेवार्ट, बेयर्स स्वानेपोएल आणि नाथन गिलख्रिस्ट यांचा समावेश होता. यापूर्वी या संघाने ६ सामने गमावले होते. मात्र चहल येताच पहिल्याच सामन्यात या संघाने शानदार विजय साकारला आहे.

भारतीय संघासाठी दमदार कामगिरी

युजवेंद्र चहलच्या रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ८० टी-२० आणि ७२ वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने वनडे क्रिकेटमध्ये १०० हून अधिक गडी बाद केले आहेत.

यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत ७२ वनडे सामन्यांमध्ये १२१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ४२ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर ८० टी-२० सामन्यांमध्ये ९६ गडी बाद केले आहेत. २५ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT