Yuzvendra Chahal saam
Sports

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलची गूढ पोस्ट, नेमका अर्थ काय? धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांना आणखी फोडणी

Yuzvendra Chahal Dhanshree Verma Divorce: धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटांच्या चर्चा दरम्यान क्रिकेटर युजवेंद्र चहलने सोशल मीडीयावर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरियोग्रफर धनश्री वर्मा सध्या त्यांच्या घटस्फोटांच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. हे दोघेही विभक्त होणार असल्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दोघांनी एकमेकांना सोशल मीडीयावर अनफॅालो केले आहे. चहलने त्याच्या इंस्टाग्राम अंकाउटवरुन पत्नी धनश्री वर्माचे सर्व फोटो डिलीट केले. मात्र, धनश्री वर्माच्या इंस्टाग्राम अकाउंट वर दोघांचे अनेक फोटो आहेत. घटस्फोटांच्या चर्चा सुरु असतानाच युजवेंद्र चहलने इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडीयावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

घटस्फोटांच्या चर्चा दरम्यान चहलची गूढ पोस्ट

युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक गूढ पोस्ट केली आहे जी धनश्रीपासून घटस्फोटाच्या बातमीशी जोडली जात आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे - ''मौन हे त्या लोकांसाठी गहन संगीत आहे, जे सर्व आदाजाच्या पलीकडे ऐकू शकतात''. ही पोस्ट सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

post

याआधीही युजवेंद्रने सोशल मीडीयावर केली होती पोस्ट

याआधीही युजवेंद्र चहलने एक पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्याने आपल्या कठोर परिश्रमाबद्दल लिहिले होते. पोस्टमध्ये त्याने लिहिले, 'मेहनत लोकांच्या चारित्र्यावर प्रकाश टाकते . तुम्हाला तुमचा प्रवास माहित आहे. तुमची वेदना तुम्हाला माहीत आहे. येथे पोहचण्यासाठी तुम्ही काय केले हे तुम्हाला माहीत आहे. जगाला माहीत आहे. येथे पोहचण्यासाठी खूप कष्ट घेतले आहे मेहनत घेतली आहे. त्याचा आई वडिलांना अभिमान आहे. त्यासाठी मुलगा म्हणून तू अभिमान बाळग.

युजवेंद्र एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला

धनश्रीपासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, नुकताच युजवेंद्र चहल एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला. युजवेंद्र चहल एका मुलीसोबत हॉटेलमधून बाहेर पडताना एका व्हिडिओमध्ये दिसला. यावेळी क्रिकेटपटूने कॅमेराकडे पाहून चेहराही लपवला. सध्या धनश्री वर्मा तिच्या आगामी म्युझिक व्हिडिओ जुट्टी कसुरीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच धनश्री किंवा युजवेंद्र या दोघांनीही त्यांच्या घटस्फोटाच्या वृत्तावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

धनश्रीने 2023 मध्ये पतीचे आडनाव काढले

धनश्री आणि युजवेंद्र यांच्या घटस्फोटाच्या चर्चेची ही पहिलीच वेळ नाही. 2023 मध्ये, जेव्हा धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून तिच्या पतीचे आडनाव 'चहल' काढून टाकले होते, तेव्हा त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर युजवेंद्रने या बातम्या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले होते.

Maharashtra Live News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या पुणे कार्यालयावर क्राईम ब्रांचची कारवाई

निवडणुकीचं मैदान मारलं, पण नियतीने हरवलं; राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविकेचा मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Black Blouse Design: काळ्या साडीवर खुलून दिसेल तुमचा तोरा! हे आहेत 5 युनिक ब्लाऊज पॅटर्न

Cat Behavior: कोणत्या लोकांना बघून मांजर पंजा मारते?

Viral video: कारसोबत झालेल्या अपघातानंतर व्यक्तीने जे केलं ते तुम्ही कधीच पाहिलं नसेल; पाहा व्हायरल व्हिडीओ

SCROLL FOR NEXT