yuvraj singh  saam tv
Sports

Yuvraj Singh Net Worth: 64 कोटींचं घर अन् 3 कोटींची कार; निवृत्तीनंतरही युवराज जगतोय luxurious लाईफ! काय आहे Income Source ?

Yuvraj Singh Income Source: निवृत्त होऊन ४ वर्षे झाली असली तरीदेखील युवराज सिंगची एकूण कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.

Ankush Dhavre

Yuvraj Singh: टी -२० क्रिकेटचा सिक्सर किंग कोण? असा प्रश्न विचारला की एकच नाव समोर येतं ते म्हणजे युवराज सिंग. भारतीय संघाला २००७ टी -२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत विजय मिळवून देण्यात युवराजने मोलाची भूमिका बजावली आहे. २०१९ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. निवृत्त होऊन ४ वर्षे झाली असली तरीदेखील युवराज सिंगची एकूण कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.

युवराज सिंगने २००३ ते २०१७ पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवराज सिंगने स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. यातून तो कोट्यवधींची कमाई करतो. एका सांकेतिक स्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, त्याची मासिक कमाई ३ कोटी रुपये इतकी आहे. तर वार्षिक उत्पन्न हे ३० कोटींच्या पुढे आहे.

युवराज सिंग आलिशान घरात राहतो. हे घर त्याने २०१० मध्ये खरेदी केले होते. या घराची किंमत ६४ कोटींच्या घरात आहे. त्याने देशभरात ठिकठिकाणी प्रॉपर्टीमध्ये ४५ कोटींची गुंतवणूक केली आहे. युवराज सिंगला कार कलेक्शनची देखील आवड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे Q5, BMW ३ Series आणि बेंटले कॉन्टिनेन्टल कार आहेत. (Latest sports updates)

युवराज सिंगने भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या २००७ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत स्टुअर्ट ब्रॉडच्या एकाच षटकात सलग ६ षटकार मारले होते. त्याने २००७ टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, ३०४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४ शतके ५२ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने ८७०१ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गंगापूर धरण ७३ टक्के भरलं, धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

SCROLL FOR NEXT