Yuvraj Singh On Rinku Singh: जास्त हवेत उडू नको... केकेआरचा मॅचविनर Rinku Singh वर युवराज भडकला

Yuvraj Singh Angry Tweet: त्याची फलंदाजी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे
rinku singh and yuvraj singh
rinku singh and yuvraj singh google
Published On

DC VS KKR IPL 2023: गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचे फलंदाज संघर्ष करताना दिसले, प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाचा डाव पत्त्यांचा बंगल्याप्रमाणे कोसळला.

मनदीप सिंग आणि रिंकू सिंग नको असलेला शॉट खेळून बाद झाले. या दोघांची फलंदाजी पाहून माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.

rinku singh and yuvraj singh
Ms Dhoni Last Match: आजचा सामना असेल MS Dhoni चा अखेरचा सामना? वाचा काय आहे कारण

या डावात रिंकू सिंग अवघ्या ६ धावा करत माघारी परतला. तर मनदीप सिंग १२ धावा करत माघारी परतला. या दोघांची फलंदाजी पाहता युवराज सिंगने (Yuvraj Singh Tweet) संताप व्यक्त केला आहे. युवराज सिंगने ट्विट करत म्हटले की, 'या परिस्थितीत त्यांच्या दृष्टिकोन चुकीचा होता. तुमचा आत्मविश्वास किती ही उंचावलेला असला तरी विकेट्स जात असताना भागीदारी करणं गजरेचं होतं. १५ षटकापर्यंत तुम्हाला टिकून राहायचं होतं, कारण मागे रसेल येणार होता.' (Latest sports updates)

कोलकाताचा पहिला डाव १२७ धावांवर संपुष्ठात..

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निणर्य घेलता होता. प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून जेसन रॉयने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. तर आंद्रे रसलने तुफानी फटकेबाजी करत ३१ चेंडूंचा सामना करत ३८ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार मारले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटक अखेर १२७ धावा केल्या.

दिल्लीचा ४ गडी राखून विजय..

दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १२८ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार मारले. तर मनीष पांडेने २१ आणि अक्षर पटेलने १९ धावांची खेळी केली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. हा दिल्लीचा या हंगामातील पहिलाच विजय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com