Yuvraj Singh News Saam Tv
Sports

Yuvraj Singh News : युवराज बनला विराटचा शेजारी, मुंबईत खरेदी केलं अलिशान घरं; किंमत वाचून व्हाल थक्क

Yuvraj Singh And Hazel Keech Purchased New House : युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी मुंबईत नवीन घर घेतलंय. या घराची किंमत जवळपास ६४ कोटी रूपये असल्याची माहिती मिळतेय.

Rohini Gudaghe

मुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज युवराज सिंग आणि पत्नी हेजल कीच यांनी मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतलंय. युवराजचा हा आलिशान फ्लॅट ज्या इमारतीत आहे, त्याच इमारतीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा देखील फ्लॅट आहे. युवराजच्या या नवीन घराची किंमत ६४ कोटी रुपये आहे. युवराजच्या या फ्लॅटमध्ये अनेक सुविधा असून तो १६ हजार स्क्वेअर फूटमध्ये आहे.

युवराज सिंग आणि हेजल कीच यांनी मुंबईत नवीन फ्लॅट खरेदी केलाय. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा ज्या इमारतीत फ्लॅट आहे, त्याच इमारतीत युवराजने फ्लॅट घेतलाय. युवराजचा फ्लॅट २९व्या मजल्यावर असल्याची माहिती (Yuvraj Singh And Hazel Keech) मिळतेय. तर कोहली या इमारतीच्या ३५व्या मजल्यावर राहतो. युवराज आणि हेजल यांच्या नवीन फ्लॅटची लिव्हिंग रूम सुंदर पेंटिंगने सजलेली आहे. इंटिरियर डिझायनरने फ्लॅटच्या कोपऱ्यांवर उत्कृष्ट काम केले आहे. युवीच्या बाल्कनीतून मुंबई शहराचं अप्रतिम दृश्य दिसतं. युवराज आणि हेजलला खेळांची खूप आवड आहे. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक वेगळा गेम झोन आहे.

युवराज आणि हेजलच्या नवीन फ्लॅटची बेडरूम देखील पाहण्यासारखी (Yuvraj Singh New House) आहे. बेडरूममध्ये चमकदार मार्बलचा वापर करण्यात आलाय. भिंतींना पांढऱ्या रंग दिलेला असून अप्रतिम रचना करण्यात आलीय. युवराजच्या या फ्लॅटची किंमत सुमारे ६४ कोटी रुपये आहे. ही किंमत विराट कोहलीच्या घराच्या जवळपास दुप्पट आहे. एकाच इमारतीत असून देखील कोहलीच्या (Virat Kohli) फ्लॅटची किंमत ३४ कोटी रुपये आहे.

केवळ मुंबईच नाही तर युवराज सिंगची इतर अनेक ठिकाणी आलिशान घरे आहेत. युवराजची गुरुग्राममध्ये देखील खास मालमत्ता आहे. ही डीएलएफ सिटीमध्ये आहे. इथेही युवराज विराट कोहलीचा शेजारी (Yuvraj Singh News) आहे. टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाचे दिल्लीतील छतरपूरमध्ये फाइव्ह बीएचके पेंटहाऊस देखील आहे. याशिवाय युवराजचा पंचकुलामध्येही एक बंगला आहे. लग्नाच्या वेळी युवीच्या या घरात डोली समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

Vijay Melava: राज-उद्धव ठाकरे एकत्र येताच संजय राऊतांचं मविआबाबत मोठं विधान

Sushil Kedia News : सुशील केडियाच्या ऑफिसची तोडफोड केल्यानंतर पहिलीच मोठी कारवाई; मनसे कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT