Yusuf Pathan got angry on hardik pandya after srh vs mi match cricket news in marathi  twitter
Sports

SRH vs MI,Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर माजी क्रिकेटपटू भडकला! मोठं वक्तव्य करत सांगितली चूक

Yusuf Pathan On Hardik Pandya: आयपीएल २०२४ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.

Ankush Dhavre

Yusuf Pathan Statement On Hardik Pandya:

आयपीएल २०२४ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर २७७ धावा केल्या. मुंबईच्या फ्लॉप कामगिरीनंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

युसूफ पठाणने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'जसप्रीत बुमराहने ११ षटकांमध्ये १६० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. जसप्रीत बुमराह अजूनपर्यंत केवळ १ षटक का दिलं? तुम्ही तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजाला गोलंदाजी द्यायला हवी. मला तरी वाटतं की, हे अत्यंत खराब नेतृत्व आहे.' युसूफ पठाणची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यासह नेटकरीही आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

मुंबईचा लज्जास्पद पराभव..

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद ८० धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने ६३ धावांची खेळी केली. (Cricket news in marathi)

यासह ट्रेविस हेडने ६२ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकअखेर ३ गडी बाद २७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला ५ गडी बाद २४६ धावा करता आल्या. मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्माने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर टीम डेव्हिडने ४२ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Somnath Suryawanshi Death: 'सोमनाथचा मृत्यू पोलीस कोठडीतच'; हायकोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम

Viral Video : मुंबईत वाहतूक कोंडीचा ‘डॉग शो’! चालकाने गाडी रस्त्यावरच सोडली, ड्रायव्हर सीटवर बसवला पाळीव कुत्रा

Beed Crime News: आई घरी नसताना मुलीला बनवायचा वासनेचा बळी; नराधम बापाला आजीवन कारावास

Nanded News: नांदेडमध्ये दिवसाढवळ्या तरुणीचं अपहरण; २ तरुणांनी जबरदस्तीने उचलून नेलं, खळबळजनक VIDEO

Maharashtra Live News Update: बुद्धिबळाची राणी दिव्या देशमुखचं नागपुरात ढोल ताशाचा गजरात स्वागत

SCROLL FOR NEXT