priyansh arya twitter
क्रीडा

Priyansh Arya: 6,6,6,6,6,6..भारताचा नवा 'युवा'राज! त्याने सलग 6 चेंडूवर ठोकले सलग 6 षटकार; पाहा VIDEO

Priyansh Arya 6 Sixes: दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत युवा फलंदाज प्रियांश आर्याने सलग ६ चेंडूंवर ६ षटकार खेचले आहेत.

Ankush Dhavre

दिल्ली प्रीमियर लीग (Delhi Premier league) स्पर्धेत युवा खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळत आहे. शनिवारचा (३१ ऑगस्ट) दिवस या स्पर्धेसाठी ऐतिहासिक ठरला. इतक्या प्रेशरमध्ये फलंदाजाला १ षटकार मारणं कठीण जातं.

दरम्यान प्रियांश आर्याने (Priyansh Arya)तुफान फटकेबाजी करत युवराज सिंगची आठवण करून दिली. डावखुऱ्या हाताच्या या फलंदाजाने सलग ६ चेंडू सीमारेषेबाहेर पाठवले. यासह युवराज सिंगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. प्रियांशने सलग ६ षटकार मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Priyansh Arya 6 Sixes Video: दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स आणि साऊथ दिल्ली सुपरस्टार्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात आयुष बदोनीने १६५ आणि प्रियांश आर्याने तुफान फटकेबाजी करत १२० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर संघाची धावसंख्या ३०८ धावांवर पोहोचवली. दरम्यान १२ व्या षटकात त्याने सलग ६ चेंडूंवर ६ षटकार खेचले.

सलग ६ चेंडूंवर ६ षटकार

तर झाले असे की, साऊथ दिल्ली सुपरस्टार्स संघाकडून आयुष बदोनी आणि प्रियांश आर्या हे दोघेही फलंदाजी करत होते. त्यावेळी नॉर्थ दिल्ली स्ट्राइकर्स संघाकडून १२ वे षटक टाकण्यासाठी मनन भारद्वाज गोलंदाजीला आला.

या षटकातील ६ च्या ६ चेंडू त्याने सीमा रेषेपार पाठवले. त्याने पहिल्या चेंडूपासून हल्लाबोल करायला सुरुवात केली. ही फटकेबाजी त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत कायम ठेवली. त्याने या सामन्यात ४० चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या डावात त्याने ५० चेंडूंचा सामना करत १२० धावांची तुफानी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने १० षटकार आणि १० चौकार खेचले.

आयुष आणि प्रियांशची तुफान फटकेबाजी

या सामन्यात आयुष बदोनी आणि प्रियांश आर्याने विरोधी संघातील गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. प्रियांशने १२० धावांची तुफानी खेळी केली. तर दुसरीकडे आयुष बदोनीनेही धावांचा पाऊस पाडला.

बदोनीने ३०० च्या स्ट्राइक रेटने धावा चोपल्या. त्याने ५५ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि १९ षटकारांच्या मदतीने १६५ धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या ३९ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

Exit Poll Maharashtra : दापोली विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT