T20 World Cup: वरुण चक्रवर्तीच्या गूगलीने शाई होपची झोप उडवली; मिडल स्टम्प झाला गूल

Varun Chakaravarthy : टी-२० विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. वरुणच्या शानदार गुगलीने शाई होपच्या दांड्या गूल करत त्याला तंबूत परत केलं.
T20 World Cup: वरुण चक्रवर्तीच्या गूगलीने शाई होपची झोप उडवली; मिडल स्टम्प झाला गूल
Published On
Summary
  • वरुण चक्रवर्तीच्या गुगलीने शाई होप बोल्ड.

  • ईडन गार्डन्सवर सुपर ८ सामन्यात पहिला ब्रेकथ्रू.

  • वेस्ट इंडिजने १९६ धावांचे लक्ष्य दिले.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा शेवटचा सुपर ८ चा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहे. या 'करो या मर' सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने भारतासमोर १९६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या एका चेंडूची चर्चा सोशल मीडिया होतेय.

वेस्ट इंडिजच्या डावादरम्यान टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने एक गुगली चेंडू टाकत सर्वांनाच धक्का दिला. त्याच्या गुगलीने शाई होपला तंबूत परत जावे लागले. वरूणच्या चेंडूने त्यांची दांडी गूल केली. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान वेस्ट इंडिजने सावध सुरुवात केली.

सलामीवीर शाई होप आणि रोस्टन चेस यांनी कोणताही धोका पत्करला नाही आणि ८.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. कॅरिबियन जोडी हळूहळू सामन्यावर नियंत्रण मिळवत होती. त्यानंतर कर्णधार सूर्याने चेंडू फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीकडे सोपवला. डावातील नववे षटक टाकण्यासाठी येत असताना वरुणने शेवटच्या चेंडूवर गुगली टाकली. ९९.२ किमी/ताशी वेगाने येत असलेला चेंडू ऑफ स्टंपजवळ आला आणि आतल्या बाजूला वळला. शाई होपने बॅकफूटवरून शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला . चेंडू मधल्या स्टम्पवर आदळला आणि दांड्या गूल झाल्या आहेत. ६८ धावांची सलामी भागीदारी तुटली आणि भारताला एक महत्त्वाची विकेट मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com