एशिया कप 2025 च्या स्पर्धेचा शेवट टीम इंडियाच्या विजयाने झाला. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करून विजेतेपद पटकावलं. विजयानंतर भारतीय टीम्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला अभिषेक शर्मा पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झाले.
याच परिषदेत पाकिस्तानच्या एका पत्रकाराने सूर्यकुमार यादवला असा प्रश्न विचारला, जो प्रत्यक्षात प्रश्नापेक्षा अधिक नाराजी आणि खंत व्यक्त करणारा होता. त्याने आपल्या मनातील सर्व खदखद एका प्रश्नात पूर्ण केली होती. यावेळी भारतीय कर्णधाराने त्यालाही अत्यंत मिश्किल स्वरूपात उत्तर दिलं.
पत्रकार परिषदेदरम्यान त्या पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला विचारलं की, भारतीय संघाने सामन्यानंतर हँडशेक आणि फोटो सेशन का केलं नाही? तसंच भारतीय टीमने पत्रकार परिषदेला राजकीय स्वरूप का दिलं? त्याने पुढे विचारलं की, तुम्हाला वाटत नाही का की तुम्ही क्रिकेटमध्ये राजकारण आणणारे पहिले कर्णधार ठरलात? हा प्रश्न विचारताना त्याच्या आवाजात नाराजी, हताशा स्पष्टपणे जाणवत होती.
हा प्रश्न ऐकल्यावर सूर्यकुमार यादव काही क्षण हसला. त्याने अतिशय हलक्या लहेजात उत्तर देताना त्या पत्रकाराला विचारलं, “गुस्सा हो रहे हो आप?” या एका वाक्यातच त्याने वातावरण हलकं केलं आणि प्रश्न विचारणाऱ्यालाही क्षणभर थांबायला लावलं.
यानंतर सूर्यकुमार म्हणाले, “तुम्ही एकदम इतक्या गोष्टी एकत्र विचारलात की नेमका प्रश्न काय आहे हेच समजलं नाही.” त्यांच्या या उत्तराने त्याने ना उग्र प्रतिक्रिया दिली ना विषय टाळला, उलट अत्यंत प्रगल्भतेने परिस्थिती हाताळली.
पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न हा भावनिक आणि आरोपात्मक स्वरूपाचा असतानाही सूर्यकुमार यादवने त्याला शांत, आत्मविश्वासपूर्ण आणि थोड्याशा विनोदी पद्धतीने उत्तर देऊन संपूर्ण प्रसंगावर आपलं नियंत्रण ठेवलं. त्यांचा हा प्रतिसाद म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखा होता ज्यामुळे त्या पत्रकाराचा प्रश्नच उलटा फसला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.