Yashasvi Jaiswal  X
Sports

Yashasvi Jaiswal : यशस्वी जयस्वाल मुंबईत खेळणार; कॅप्टन्सीसाठी गोवा संघाकडून खेळण्याची केलीय तयारी, पण...

Yashasvi Jaiswal News : आयपीएल २०२५ मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स या सामन्यामध्ये यशस्वी जयस्वालने ७५ धावा केल्या. पण वादळी खेळीपेक्षा वेगळ्याच कारणामुळे यशस्वी जयस्वाल चर्चेत आहे.

Yash Shirke

IPL 2025 मधील राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना सुरु आहे. या सामन्यात बंगळुरूच्या विरुद्ध खेळताना यशस्वी जयस्वालने दमदार ७५ धावा केल्या. राजस्थानचा डाव यशस्वीच्या खेळीमुळे वाचला. याच दरम्यान यशस्वी जयस्वालच्या नावाची वेगळ्याच कारणामुळे चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यशस्वी जयस्वाल मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. तो मुंबईच्या संघाकडून रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये खेळत होता. पण त्याने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. यशस्वीने अजिंक्य रहाणेच्या किटबॅगला लाथ मारली होती. रहाणेचा अपमान केल्यानंतर जयस्वालला ताकीद देण्यात आली. तेव्हा मुंबईचा संघ सोडून यशस्वीने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल २०२५ मध्ये यशस्वी जयस्वाल व्यस्त आहेत. तो राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर आहे. आयपीएल संपल्यानंतर तो मुंबईत खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई टी-२० क्रिकेट लीगला मे महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएलनंतर लगेच टी-२० क्रिकेट लीगमध्ये यशस्वी जयस्वाल सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीसीसीआयने परवानगी घेतल्यानंतरच आयपीएल खेळणारे खेळाडू मुंबई टी-२० लीगमध्ये खेळू शकणार आहेत.

यशस्वी जयस्वाल राजस्थानकडून खेळताना आयपीएल २०२५ मधील ६ सामन्यांमध्ये सहभागी झाला आहे. त्याने ३०.३३ च्या सरासरीने १८२ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट १३८.९३ आहे. आयपीएलच्या इतिहासात जयस्वालने ५९ सामन्यांमध्ये एकूण १७८९ धावा केल्या आहेत. यात ११ अर्धशतक आणि २ शतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care: केमिकल नको, घरगुती सामग्रींनी घरीच बनवा लिप बाम; या थंडीत ड्राय ओठांपासून ३ दिवसात मिळेल सुटका

Poor Sleep: तुमच्या 'या' वाईट सवयीमुळे झोप येण्यास येतो अडथळा, आजच टाळा

Last Stop Khanda Marathi Movie: प्रत्येकाला थिरकायला लावणारं "लास्ट स्टॉप खांदा" चित्रपटाचं टायटल साँग रिलीज, चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra Live News Update: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जलसमाधी आंदोलन

Rohit Arya Encounter: पवई ओलीसनाट्यातील आरोपीच्या छातीत गोळ्या, पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काऊंटर|VIDEO

SCROLL FOR NEXT