rohit sharma with yashasvi jaiswal twitter
क्रीडा

Yashasvi Jaiswal Record: जयस्वालची 'यशस्वी' कामगिरी! मोठ्या रेकॉर्डमध्ये रोहित शर्माला सोडलं मागे

Yashasvi Jaisal Breaks Rohit Sharma Record: भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने रोहित शर्माला मागे सोडलं आहे.

Ankush Dhavre

अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये संयुक्तरित्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. या स्पर्धेसाठी यशस्वी जयस्वालचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकही सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान झिम्बाब्वेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने रोहित शर्माला मागे सोडलं आहे. (Yashasvi Jaiswal Record)

सध्या भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसरा सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने २३ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने ४९ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर १८२ धावा केल्या. झिम्बाब्वेला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १५९ धावा करता आल्या. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

यशस्वीने रोहितला सोडलं मागे

भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्माला मागे सोडलं आहे. यशस्वी जयस्वाल या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. या वर्षात यशस्वी जयस्वालला अवघे ९ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ८४८ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने आतापर्यंत ८३३ धावा केल्या आहेत. यावर्षी रोहित आणि यशस्वीची हवा पाहायला मिळाली आहे. तर अनुभवी फलंदाज विराट कोहलीला आपली छाप सोडता आलेली नाही.

यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझमलाही मागे सोडलं आहे. बाबर आझमने आतापर्यंत ७०९ धावा केल्या आहेत. या धावा त्याने २५ डावात केल्या आहेत. तर अफगाणिस्तानचा सलामीवीर फलंदाज रहमानुल्लाह गुरबाजने आतापर्यंत ७७३ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT