Yashasvi Jaiswal /BCCI saam tv
Sports

जबरदस्त! जयस्वालनं वेस्ट इंडीजची केली धुलाई, शतक ठोकलं; जे फक्त सचिन तेंडुलकरला जमलं, ते यशस्वीलाच करता आलं

Yashasvi Jaiswal Century : युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडीजला अक्षरशः मेटाकुटीला आणलं. दिल्ली कसोटीत कमालीचा संयम दाखवत शतकी खेळी केली. कसोटी कारकि‍र्दीतील हे त्याचं सातवं शतक आहे.

Nandkumar Joshi

  • भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यात दुसरा कसोटी सामना

  • पहिल्या डावातच यशस्वी जयस्वाल यानं दिला जोरदार दणका

  • वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

  • कसोटी कारकीर्दीतील सातवं शतक

गुजरातच्या अहमदाबादमध्ये 'खामोश' असलेली यशस्वी जयस्वालची बॅट दिल्लीत तळपली. पहिल्या कसोटीतील कसर त्यानं दिल्लीतील दुसऱ्या कसोटीत भरून काढली. वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांना अक्षरशः मेटाकुटीला आणलं. पहिल्याच डावात यशस्वीनं जबरदस्त शतकी खेळी केली. कसोटी कारकीर्दीत त्यानं सातव्यांदा शतक ठोकण्याची किमया केली.

यशस्वी जयस्वाल यानं वेस्ट इंडीजविरुद्ध मायदेशातील मैदानावर पहिलं शतक झळकावलं आहे. तर या संघाविरोधात त्याचं हे दुसरं शतक आहे. यशस्वीने या शतकी खेळीसह आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवले आहेत.

पहिल्या बॉलपासूनच फॉर्मात

यशस्वी जयस्वाल यानं डावाची सुरुवात अत्यंत संयमाने केली. बऱ्याचदा यशस्वी हा वेगवान सुरुवात करतो. मात्र, दिल्लीच्या या खेळपट्टीवर त्यानं स्थिरस्थावर होण्यासाठी बराच वेळ घेतला. यशस्वीने केएल राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी १५.४ षटकांत ५० धावा जोडल्या. राहुल बाद झाल्यानंतर जयस्वालनं डाव सावरला. १० चौकारांच्या मदतीने ८२ चेंडू खेळून काढत अर्धशतक पूर्ण केले. साई सुदर्शनसोबत शतकी भागीदारी रचली. टीम इंडियाला त्यानं मजबूत स्थितीत आणलं आहे. त्यानंतर जयस्वालनं १४५ चेंडू खेळून काढत शतक पूर्ण केलं.

जयस्वालनं रेकॉर्डचा पाऊस

यशस्वी जयस्वाल हा स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. पण खेळपट्टीचा अंदाज घेत दिल्ली कसोटीत त्यानं संयमी सुरूवात केली आणि शतकी खेळी साकारली. सुनील गावसकर यांच्यानंतर कसोटीत भारतासाठी सर्वात वेगवान ३००० धावा करणारा यशस्वी दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने ७१ डावांत या धावा केल्या आहेत. सुनील गावसकर यांनी ६९ डावांत ३००० धावा केल्या होत्या.

सचिननंतर यशस्वीच!

यशस्वी जयस्वाल हा अवघ्या २३ वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीत कसोटीत यशस्वीने आतापर्यंत ७ शतके ठोकली आहेत. इतक्या कमी वयात सर्वाधिक शतके फक्त सचिन तेंडुलकर याने केली होती. सचिनने ११ शतके ठोकली होती. जयस्वाल यानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शतकांच्या बाबतीत पंत आणि केएल राहुल या दोघांना मागे टाकले आहे. या दोघांनीही प्रत्येकी सहा शतके केली आहेत. तर जयस्वालची सात शतके झाली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wall Stain: डाग अच्छे है! मुलांनी भिंतीवर चित्र काढून भिंती खराब केल्या? 'या' सिंपल ट्रिक्सनं होतील साफ

Pune News: पुण्यात "मनाचे श्लोक" चित्रपटाचा शो बंद पाडला; काय आहे कारण?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो केवायसी करा, नाहीतर... अजित पवारांची वॉर्निंग; Video

Maharashtra Live News Update: घायवळच्या जमिनी खरेदी-विक्री व्यवहाराची ४० प्रकरणं समोर

Maharashtra Politics : ठाकरेंच्या युतीत पवारांची एन्ट्री, पण महाविकास आघाडीचं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT