ऋषभ पंतला टीम इंडियात कधी मिळणार संधी?
Rishabh Pant saam tv

Rishabh Pant Update : ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट, मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, टीम इंडियात कधी होणार एन्ट्री?

Rishabh Pant Injury Update : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. इंग्लंड दौऱ्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाला होता.
Published on
Summary
  • ऋषभ पंतबाबत मोठी अपडेट

  • टीम इंडियात कमबॅकसाठी सज्ज

  • रणजी ट्रॉफीनंतर कधी मिळणार टीम इंडियात संधी

भारतीय संघाचा विकेटकीपर आणि विस्फोटक फलंदाज ऋषभ पंतच्या कमबॅकबाबत नवीन माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळं तो काही महिन्यांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. इंग्लंड दौऱ्यावर मॅन्चेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पंतला दुखापत झाली होती. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यानं फेकलेला वेगवान चेंडू त्याच्या बुटांवर लागला होता. त्याच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे या मालिकेतून त्याला बाहेर व्हावं लागलं होतं. पंत अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळं आशिया कपमध्येही सहभागी होऊ शकला नव्हता. आता वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेला ऋषभ पंत कमबॅकसाठी सज्ज झाला आहे, असं वृत्त आहे.

कमबॅक होणार, पण...

ऋषभ पंत दुखापतीमुळं संघाबाहेर होता. आता तो मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तीन महिने दुखापतग्रस्त असलेला पंत आता रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानात उतरेल. २५ ऑक्टोबरपासून दिल्लीत होणाऱ्या सामन्यात खेळण्याची इच्छा असल्याचे त्याने दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. पण त्यासाठी आता बीसीसीआयच्या मेडिकल टीमकडून फिटनेस क्लिअरन्सची आवश्यकता भासणार आहे. तसं झालं तर तो दिल्ली संघाचं नेतृत्वही करू शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयची मेडिकल टीम लवकरच सेंटर ऑफ एक्सेलन्समध्ये पंतच्या दुखापतग्रस्त पायाची तपासणी करणार आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम सध्या तरी त्याच्याबाबतीत कोणतीही जोखीम पत्करू इच्छित नाही. दिल्लीच्या कॅम्पमध्ये कधी जाणार याबाबत पंतने तारीख निश्चित केलेली नाही. पण १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांत खेळणे सध्या तरी शक्य नाही, असे बोलले जात आहे.

ऋषभ पंतला टीम इंडियात कधी मिळणार संधी?
Team India Captain : रोहित शर्मानंतर आता क्रिकेट विश्वाला मिळणार दुसरा धक्का? सूर्यकुमार यादवबाबत मोठी भविष्यवाणी

दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या मालिकेत मिळू शकते संधी

भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पंत त्याआधीच फिट झाला तर रणजी ट्रॉफीनंतर त्याचं टीम इंडियात पुनरागमन होऊ शकतं. सध्या संघात त्याची जागा ध्रुव जुरेल यानं घेतली आहे. टीम इंडियात त्याला संधी मिळत असून, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यानं त्या संधीचं सोनं केलं आहे. शतकी खेळी आणि स्टम्पच्या मागेही त्यानं चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळं टीम इंडियात पुनरागमन करायचं असेल तर त्याला मोठ्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

ऋषभ पंतला टीम इंडियात कधी मिळणार संधी?
Team India: वेस्ट इंडीजवर मोठा विजय, पण टीम इंडियासाठी निराशाजनक बातमी! नेमकं घडलं तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com