yashasvi jaiswal saam tv
Sports

Fastest Fifty In IPL History: मानलं रे भावा! मुंबईकर जयस्वालने तुफानी खेळी करत IPL स्पर्धेत रचला इतिहास

Yashasvi Jaiswal Fastest Fifty In IPL: अर्धशतक झळकावताच त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

KKR VS RR IPL 2023: कोलकाताच्या ईडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात रोमांचक सामना पार पडला. तसं हे कोलकाता नाईट रायडर्स संघाचं घरचं मैदान आहे.

मात्र आजच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या फॅन्सच्या तोंडावर एकच नाव होतं ते म्हणजे यशस्वी जयस्वाल. या फलंदाजाने कामगिरीच अशी केली आहे. एक वेळ अशी देखील आली होती जेव्हा असे वाटू लागले होते की, आज यशस्वी युवराजचा रेकॉर्ड मोडणार.

त्याचा हा रेकॉर्ड थोडक्यात हुकला. दरम्यान अर्धशतक झळकावताच त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

राजस्थान रॉयल्स संघाला या सामन्यात केवळ १५० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार नीतीश राणाविरुध्द फलंदाजी करताना तब्बल २६ धावा चोपल्या.

यादरम्यान त्याने २ षटकार आणि ३ चौकार मारले. त्यानंतर शार्दुल ठाकूरच्या षटकात ३ चौकार मारत त्याने १३ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि इतिहासाला गवसणी घातली.

आयपीएल स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक ..

यशस्वी जयस्वालचं नाव आता सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार आहे. कारण त्याने अवघ्या १३ चेंडूंचा सामना करत आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले आहे.

यापूर्वी केएल राहुल आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी १४-१४ चेंडूंचा सामना करत अर्धशतक झळकावले होते. तर माजी भारतीय क्रिकेटपटू युसुफ पठाणने १५ चेंडूंचा सामना करत आणि सुनील नरेनने देखील १५ चेंडूंचा सामना करत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. (Latest sports updates)

आयपीएलच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज..

यासह यशस्वी जयस्वालच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने नीतीश राणाच्या षटकात फलंदाजी करताना पहिल्याच षटकात २६ धावा खर्च केल्या. हे पहिले षटक आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात महागडे षटक ठरले आहे. .

रॉयल चॅलेंजर्स विरुध्द मुंबई इंडियन्स (२७ धावा)

कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द राजस्थान रॉयल्स (२६ धावा)

कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द मुंबई इंडियन्स(२६ धावा)

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स २५ धावा)

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने या डावात प्रथम फलंदाजी करताना १४९ धावा केल्या होत्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून वेंकटेश अय्यरने ५७ धावांची खेळी केली. तर नीतीश राणाने २२ धावांचे योगदान दिले. या धावांचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ९८ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसनने ४८ धावांचे योगदान दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

Chai Masala Powder : चहाचा स्पेशल मसाला घरी कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT