yashasvi jaiswal twitter
Sports

Yashasvi Jaiswal Record: रांची कसोटीत यशस्वी जयस्वालला महारेकॉर्ड करण्याची संधी! या बाबतीत दिग्गजाला सोडणार मागे

IND vs ENG,4th Test: रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत यशस्वी जयस्वालला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. काय आहे रेकॉर्ड जाणून घ्या.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal, IND vs ENG 4th Test:

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालची बॅट आग ओकतेय. या २२ वर्षीय फलंदाजाने इंग्लंडच्या बॅझबॉलला सडेतोड उत्तर दिलं आहे. राजकोट कसोटीत त्याने फिरकी गोलंदाजांना तर धुतलंच.

यासह इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज जेम्स अँडरसनलाही भरदिवसा चांदण्या दाखवल्या. या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याने नाबाद २१४ धावांची खेळी केली. दरम्यान रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

हा मोठा रेकॉर्ड करण्याची संधी..

यशस्वी जयस्वालला केवळ ७ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. यादरम्यान खेळलेल्या १३ डावात त्याने ८६१ धावा कुटल्या आहेत. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा करण्यासाठी केवळ १३९ धावांची गरज आहे. रांची कसोटीत जर त्याने १३९ धावा केल्या तर तो भारतीय संघासाठी सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरेल.

या रेकॉर्डमध्ये तो भारताचा माजी फलंदाज विनो कांबळीला मागे सोडण्याची संधी असणार आहे. विनोद कांबळीने हा कारनामा आपल्या १२ व्या कसोटी सामन्यात केला होता. चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात त्याने १३९ धावा केल्या. तर तो सर्वात कमी डावात १००० धावा पूर्ण करण्याच्या रेकॉर्डमध्ये विनोद कांबळीची बरोबरी करणार आहे. विनोद कांबळीने हा कारनामा १४ व्या डावात केला होता. (Cricket news in marathi)

यशस्वी जयस्वालची तुफान फटकेबाजी..

भारत- इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने धावांचा पाऊस पाडला आहे. या मालिकेतील ३ कसोटी सामन्यातील ६ डावात त्याने १०० पेक्षाही अधिकच्या सरासरीने ५४५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ दुहेरी शतकं आणि १ अर्धशतकीय खेळी केली आहे.

यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाचांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने ३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ५० चौकार आणि २२ षटकार मारले आहेत. राजकोटच्या मैदानावर केलेली २१४ धावांची खेळी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून आणखी ६१,१४६ महिलांचे अर्ज बाद, तुमचं नाव नाही ना?

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात कर्जत- बदलापूर लोकल वाहतूक सुरू होणार

Manikrao Kokate : रोहित पवारांनी आणखी एक पत्ता काढला, कृषीमंत्र्यांवर केला गंभीर आरोप

Igatpuri Tourism : पावसाच्या सरी अन् धुक्याची चादर, इगतपुरीजवळ वसलाय निसर्गाचा अद्भुत नजारा

Ladki Bahin Yojana : लाडकीमुळे महाराष्ट्रातील ४ योजना बंद; लाभार्थी शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT