yashasvi jaiswal  pti
Sports

Yashasvi Jaiswal Record: यशस्वी जयस्वालने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये सेहवागला मागे सोडत बनला नंबर 1

Yashasvi Jaiswal Record In Test Cricket: भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

IND vs NZ 2nd Test,Day 3: वेस्टइंडीजविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा यशस्वी जयस्वालने कसोटीत डावाची सुरुवात करताना नेहमीच स्वत:ला सिद्ध केलंय. जेव्हा जेव्हा भारतीय संघाला गरज होती, तेव्हा त्याने संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावातही त्याने भारतीय संघाला शानदार सुरुवात करुन दिली. यादरम्यान त्याने विरेंद्र सेहवागचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

यशस्वी जयस्वालची कसोटी कारकिर्द सुरु होऊन अवघे काही महिनेच झाले आहेत. मात्र या छोट्याशा कारकिर्दीत त्याने मोठे कारनामे करुन दाखवले आहेत. यशस्वी जयस्वाल न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात फलंदाजी करताना १००० धावांचा आकडा गाठला आहे.

त्याने भारतात फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह भारतासाठी भारतात फलंदाजी करताना सर्वात जलद (चेंडूंच्या बाबतीत) १००० धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने विरेंद्र सेहवागला मागे सोडलं आहे.

यशस्वी जयस्वालने १३१५ चेंडूंचा सामना करत १००० धावांचा आकडा गाठला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड विरेंद्र सेहवागच्या नावावर होता. सेहवागने १४३६ चेंडूत १००० धावांचा पल्ला गाठला होता. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने १५०६ चेंडूत हा कारनामा केला होता.

भारतात कसोटी क्रिकेट खेळताना सर्वात वेगवान( चेंडूंच्या बाबतीत) १००० धावा करणारे फलंदाज

  • १३१५ चेंडू - यशस्वी जयस्वाल

  • १४३६ चेंडू - विरेंद्र सेहवाग

  • १५०६ चेंडू- रोहित शर्मा

एकाच वर्षात १००० धावा करणारे भारतीय फलंदाज

यशस्वी जयस्वाल हा कसोटी क्रिकेटमध्ये फलंदजी करताना एकाच वर्षात १००० धावा पूर्ण करणारा चौथा भारतीय सलामीवीर फलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर, विरेंद्र सेहवाग आणिा गौतम गंभीरने हा कारनामा करुन दाखवला आहे.

भारतीय संघासाठी कसोटीत एकाच वर्षात १००० धावा करणारे सलामीवीर फलंदाज

  • सुनील गावसकर - १९७६, १९७८,१९७९, १९८३

  • विरेंद्र सेहवाग - २००४,२००८

  • गौतम गंभीर - २००८

  • यशस्वी जयस्वाल- २०२४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urfi Javed: डोळ्याखाली जखम, चेहऱ्यावर रक्त; उर्फी जावेदची अशी का झाली अवस्था ? चाहते चिंतेत

७५ वर्षीय वृद्धेचे अब्रुचे लचके तोडले, झोपडपट्टीत घुसून तरूणाकडून जबरदस्ती, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

SCROLL FOR NEXT