yashasvi jaiswal twitter
Sports

Yashasvi Jaiswal: 'गप आपलं काम करना..' खोड काढणाऱ्या कॉन्टासला जयस्वाल मैदानातच भिडला;VIDEO

Yashasvi Jaiswal Fight With Sam Kontas: यशस्वी जयस्वाल आणि सॅम कॉन्टास यांच्यात बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला १८४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

या कसोटीत भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल चमकला. त्याने पहिल्या डावात फलंदाजी करताना ८२ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याला ८४ धावांवर माघारी परतावं लागलं. ज्यावेळी रिषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे फलंदाज फलंदाजी करत होते, त्यावेळी असं वाटलं होतं की, ही जोडी सामना ड्रॉ करुन देईल. मात्र असं होऊ शकलं नाही.

जयस्वाल आणि कॉन्टास लाईव्ह सामन्यात भिडले

भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि सॅम कॉन्टास चांगली फलंदाजी करते होते. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र रिषभ पंतचा विकेट गेल्यानंतर विकेटची रांगच लागली. यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती.

ज्यावेळी तो फलंदाजी करत होता, त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेला सॅम कॉन्टास त्याची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करत होता. कॉन्टास त्याला काहीतरी बोलताना दिसून आला. त्यानंतर जयस्वालने त्याच्या बॅटने जोरदार उत्तर दिलं. नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, यशस्वी जयस्वाल ज्यावेळी फलंदाजी करत होता, त्यावेळी कॉन्टास सतत काहीतरी बोलून त्याला त्रास देण्याता प्रयत्न करत होता. सुरुवातीला यशस्वीने इग्नोर केलं, पण पाणी डोक्यावरुन गेल्यानंतर यशस्वीने त्याला चांगलच झापलं. आधी तोंडाने आणि मग बॅटने चांगलच उत्तर दिलं.

काय म्हणाला जयस्वाल?

यशस्वी कॉन्टासवर भडकला आणि तुझं काम करन.. असं म्हणाला. त्यानंतर रिषभ पंतने त्याला काय झालं? असं विचारल्यावर यशस्वीने जे घडलं ते सांगितलं. फलंदाजी करत असताना, कॉन्टास त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता.

त्यामुळेच त्याने कॉन्टासला आपलं काम करायला सांगितलं. त्यानंतर यशस्वी पुन्हा फलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. पुढच्या चेंडूवर त्याने जोरदार फटका मारला, जो कॉन्टासच्या पाठीला जाऊन लागला. त्याला हा चेंडू जोरात लागला, पण त्याने काहीच झालं नाही असं दाखवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT