Team india twitter
Sports

WTC Points Table: टीम इंडियाला मोठा फायदा; कसोटीत इंग्लंडला पराभूत करताच WTC Points Table मध्ये गरूडझेप

WTC Standings: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारतीय संघाला WTC च्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे.

Ankush Dhavre

WTC Points Table News:

वायझॅग कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडवर १०६ धावांनी (IND vs ENG) जोरदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ ची बरोबरी साधली आहे. या विजयासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही मोठा फायदा झाला आहे.

हैदराबाद कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला होता. मात्र आता दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी धडक दिली आहे. (WTC Points Table)

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर भारतीय संघ पाचव्या स्थानी पोहोचला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाची विजयाची सरासरी ४३.३३ टक्के इतकी होती. तर दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५२.७८ वर जाऊन पोहोचली आहे.

पराभवानंतर इंग्लंडचं मोठं नुकसान?

हा कसोटी सामना गमावुनही इंग्लंडचा संघ होता त्याच स्थानी कायम आहे. मात्र त्यांची विजयाची सरासरी कमी झाली आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडचा संघ गुणतालिकेत ८ व्या स्थानी होता. आता पराभवानंतरही इंग्लंडचा संघ ८ व्या स्थानी कायम आहे. मात्र इंग्लंडची विजयाची सरासरी २५ टक्के इतकी झाली आहे. (Cricket news in marathi)

तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला ३ सामने जिंकता आले आहेत. तर २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर १ सामना बरोबरीत सुटला आहे.

इतर संघांबद्दल बोलायचं झालं तर, ५५ टक्के विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ५२.७८ टक्के विजयाच्या सरासरीसह तिसऱ्या स्थानी आहे. ५० टक्के विजयाच्या सरासरीसह न्यूझीलंडचा संघ पाचव्या स्थानी.

तर ५० टक्के विजयाच्या सरासरीसह बांगलागेशचा संघ पाचव्या स्थानी, ३६.६६ टक्के विजयाच्या सरासरीसह पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानी, ३३.३३ टक्के विजयाच्या सरासरीसह वेस्टइंडिजचा संघ सातव्या, २५ टक्के विजयाच्या सरासरीसह इंग्लंडचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. तर २ टक्के विजयाच्या सरासरीसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT