team india saam tv news
क्रीडा

WTC Points Table: दारुण पराभवानंतर पाकिस्तानला मोठा धक्का! ऑस्ट्रेलियाच्या विजयानं टीम इंडियाचा झाला फायदा

Australia vs Pakistan: पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना पार पाडला. या सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

WTC Points Table 2023 Latest Updates:

पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. पहिल्याच कसोटीत पाकिस्तानला ३६० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. पराभव पाकिस्तानचा झाला असला तरीदेखील याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहोचला आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी होता. मात्र आता दोन्ही संघांची विजयाची सरासरी सारखीच आहे. भारतीय संघाने एकही सामना न गमावल्याने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे.

पाकिस्तानच्या पराभवाने पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फेरबदल..

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना खेळण्यापूर्वी पाकिस्तानची विजयाची सरासरी १०० टक्के होती. मात्र आता पराभवानंतर विजयाची सरासरी कमी झाली आहे. ही सरासरी ६६.६८ वर पोहोचली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत.

यादरम्यान पाकिस्तानला २ सामना जिंकता आले आहेत. तर एका सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आहे. तर भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं तर, २ पैकी एका सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. भारतीय संघाची विजयाची सरासरी ही ६६.६७ इतकी आहे. (Latest sports updates)

इतर संघांबद्दल बोलायचं झालं तर, न्यूझीलंडचा संघ या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडची विजयाची सरासरी ५० टक्के इतकी आहे. तर बांगलादेशची सरासरी देखील ५० टक्के इतकी आहे. बांगलादेशचा संघ या यादीत चौथ्या स्थानी आहे. ४१.६७ विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत पाचव्या स्थानी आहे.

वेस्टइंडिजचा संघ या यादीत सहाव्या स्थानी आहे. वेस्टइंडीजची विजयाची सरासरी १६.६७ इतकी आहे. आतापर्यंत सर्व संघांना जास्त सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक ६ सामने खेळले आहेत. यादरम्यान ३ सामने जिंकले आहेत. तर २ सामन्यांमध्ये पराभव आणि १ सामना बरोबरीत सुटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Fashion Tips :हिवाळ्यात Cool अन् Cozy लूक हवाय? 'या' फॅशन टिप्स फॉलो करा, प्रत्येकजण तुम्हाला पाहून वेडा होईल

satyanarayan vrat 2024: सत्यनारायणाची पूजा करायचीय? या महिन्यातील हा दिवस शुभ, जाणून घ्या मुहूर्त आणि विधी

Kanguva Movie Review: दमदार ॲक्शनवाला सूर्या आणि बॅाबी देओलचा 'कांगुवा ' प्रदर्शित, प्रेक्षकांना कसा वाटला चित्रपट जाणून घ्या

Durga Serial: दुर्गा आणि अभिषेकच्या नात्यात येणार दुरावा? मालिकेमध्ये नेमकं असं काय घडणार?

Gujarat : सुट्टीत मित्रांसोबत तुफान मजा करा, गुजरातच्या 'या' खास लोकेशन भेट द्या

SCROLL FOR NEXT