WTC points table latest update after india vs England 3rd test rajkot  saam tv news
Sports

WTC Point Table: इंग्लंडला लोळवताच टीम इंडियाला मिळाली गुड न्यूज! पाहा नेमकं काय घडलं?

World Test Championship Points Table: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 3rd Test, WTC Point Table:

इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. राजकोटच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर ४३४ धावांनी मात केली आहे. दरम्यान या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतही भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ अव्वल स्थानी आहे. न्यूझीलंडची विजयाची सरासरी ७५ टक्के इतकी आहे. तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ५९.५२ इतकी आहे. भारतीय संघ या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. ५५ टक्के विजयाच्या सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाविरुद्ध खेळताना सलग २ सामने गमावणाऱ्या इंग्लंडचं मोठं नुकसान झालं आहे. इंग्लंडचा संघ २१.८७ टक्के विजयाच्या सरासरीसह गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने ७ सामने खेळले आहेत. यापैकी ४ सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे. तर २ सामने गमावले असून १ सामना ड्रॉ झाला आहे. (Cricket news in marathi)

भारतीय संघाने वेस्टइंडीज दौऱ्यावर झालेली कसोटी मालिका १-० ने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला. दौऱ्यावरील कसोटी मालिका १-१ च्या बरोबरीत समाप्त झाली. मायदेशात इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाने बाजी मारली आहे.

भारतीय संघाचा शानदार विजय..

भारतीय संघाने राजकोट कसोटीत ४३४ धावांनी विजय मिळवला आहे. हा भारतीय संघाने इंग्लंडवर मिळवलेला सर्वात मोठा विजय आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाची प्लेअर ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात आली आहे. त्याने ११२ धावा करत ७ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT